कुटे ग्रुपच्या वाहनांची विक्री थांबवा !
ज्ञानराधाच्या ठेवीदारांनी RTO कडे केली मागणी.

आनंद वीर(प्रतिनिधी) ज्ञानराधा मल्टीस्टेट अध्यक्ष सुरेश कुटे यांनी ज्यादा व्याजदर देण्याचे आमिष दाखवून हजारो ठेवीदाराची फसवनुक केल्याने सुरेश कुटे ,अर्चना कुटे सहसंचालक मंडळावर बीड जिल्ह्यासह विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याने सुरेश कुटे हे सध्या कारागृहात आहेत.कुटे ग्रुप वर ED ने कारवाई करत महाराष्ट्रातील कुटे ग्रुपच्या कंपन्यां सील करून कुटे ग्रुपची वाहन विक्री करून याचा लिलाव करून ठेविदारांचे पैसे परत देण्याचे सांगण्यात येत होते. परंतु कुटे ग्रुपची आणि वाहने परस्वर विकल्याचे समोर येत आहे. त्यामुळे हजारो ठेवीदारांच्या ठेवी परत मिळण्याच्या आशा मावळ्या आहेत.ज्ञानराधाच्या ठेवीदारांची अधिकाऱ्यांकडे मान्यायप्रविष्ट असलेल्या ज्ञानराधा मल्टिस्टेटचे चेअरमन सुरेश कुटे, द कुटे ग्रुपच्या अध्यक्षा अर्चना सुरेश कुटे व ज्ञानराधाचे उपाध्यक्ष यशवंत कुलकर्णी यांच्या सर्व वाहनांची खरेदी व विक्री तत्काळ थांबवावी अशी मागणी ठेवीदार विजयकुमार धांडे, अॅड. सुधीर खाडे, विनोद चव्हाण, संविनोद चव्हाण, संतोष माने यांनी निवेदनाद्वारे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल माने यांच्याकडे केली आहे.ज्ञानराधा मल्टिस्टेट संबंधी सुरेश कुटे, अर्चना कुटे, यशवंत कुलकर्णी यांच्यासह सर्व संचालक यांच्या नावावरील तसेच द कुटे ग्रुप च्या नावावरील कोणालाही पावर ऑफ पॅटर्न करून गाड्या विक्री करू नये. कोणाच्याही नावावर करू नयेत. सर्व गाड्या ब्लॅक लिस्ट मध्ये टाकाव्यात. आतापर्यंत ज्या गाड्या विकल्या आहेत. त्या तत्काळ ब्लॅक लिस्ट मध्ये टाकाव्यात अशी मागणी मंगळवारी ठेवीदारांनी केली. अन्यथा उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या विरोधात न्यायालयात दादा मागण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.