नगर रोडवर टिप्परने महिलेस उडवले !
रस्त्याचे काम चालू असल्याने रोजच अपघात,महिला गंभीरित्या जखमी

आनंद वीर (प्रतिनिधी)आज दिनांक 5 डिसेंबर रोजी बीड शहरातील नगर रोडवर टिप्परने स्कुटी वरील महिलेस उडवले, महिलेला टिप्परने धक्का दिल्याने महिला खाली पडून गंभीर जखमी झाली असून, वाहतूक पोलीस सचिन क्षीरसागर यांनी महिलेला उपचारासाठी दवाखान्यात पाठवण्यात आले.शहरातील नगर रोडचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. गुत्तेदाराच्या मनमानी कारभारामुळे या रस्त्यावर कसलेही प्रकारची दिशादर्शक फलक लावण्यात आलेले नाही, त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन, रोजच अपघात होत आहेत. काही ठिकाणी कच्चा रस्ता खालीवर असल्याने चारचाकी वाहन तसेच दुचाकी स्वाराला याचा त्रास सहन करावा लागत असून कित्येक दुचाकी वरील नागरिक,महिला ह्या घसरून पडल्या आहे. या प्रकारातून गुत्तेदाराची मनमानी कारभार सर्वसामान्यांच्या मुळावर आल्याचे दिसून येत आहे. रस्ता खाली-वर असल्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरुन गाड्या चालवाव्या लागतात.आज सकाळी 9:30 वाजता स्कुटी क्रमांक.MH 23 BK 3391 वरून जात असताना महिलेस टिप्पर क्रमांक MH 23W7111 ने धक्का दिल्याने महिला खाली पडून जखमी झाली.वेळीच महिला टिप्पर पासून बाजूला झाल्याने जीव वाचला. या अपघातामुळे वाहतुक कोंडी मोठ्या प्रमाणावर झाली होती.