ताज्या घडामोडी

शिक्षक खून प्रकरणातील १४आरोपीं दोषी

बीड न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल १४ दोषी तर ३निर्दोष मुक्तता.

बीड शहरात बालेपीर भागातील शिक्षक सय्यद साजेदआली यांचा भरदिवसा खूनाची घटना घडली होती. हे प्रकरण जिल्हाभरात गाजलं होतं. या प्रकरणी एकूण १८ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा आज निकाल असल्याने असल्याने बीड न्यायालयात गर्दी जमली होती तर पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. यावेळी मा. कोटनि २,३,४सुनावणी सोमवारी होणार असल्याने कोर्ट काय निर्णय घेणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.सैनिकी विद्यालयातील कार्यरत शिक्षकसय्यद साजेदअली (वय ३८ वर्ष) यांचा शहरातील बालेपीर भागात दि.१९ सप्टेंबर२०१९ रोजी दुपारी 2 वाजण्या सुमारास धारदार शस्त्राने वार करुन खून करण्यात आला होता. आरोपींना तत्काळ अटक करण्यासाठी नातेवाईकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात ठिय्या मांडला होता.हे प्रकरण जिल्ह्यात चांगलेच गाजले होते. प्रकरणी गुज्जर खान सह इतर १८ आरोपीच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. खूनाच्या गुन्ह्यास मोक्का,मुंबई शस्त्र बंदी सह आदी कलमानुसार गुन्हा कोर्टात प्रकरण सुरू होते.आत्तापर्यंतच्या बीडच्या विशेष मोक्का न्यायालयाचा पहिलाच मोठा निकाल बीड येथील बहुचर्चित साजेद अली खून प्रकरणात मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल झालेले असल्याने सदरील प्रकरण बीडच्या विशेष मोक्का न्यायालयात चालवण्यात आले.आत्ता पर्यंतच्या इतिहासात विशेष मोक्का न्यायालयाचा हा पहिलाच मोठा निकाल असुन तब्बल १४ जणांना दोषी ठरवण्यात आले आहे. त्यामुळे न्यायालयाने दिलेला निकाल महत्वाचा ठरला असुन आता मोक्का न्यायालय सोमवार दि.९ डिसेंबर रोजी काय निकाल देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.या १४ जणांना ठरवले दोषी अन्वर खान उर्फ गुजर खान मिर्झा खान (रा.गुलशन नगर बालेपीर बीड), मुजीब खान मिर्झा खान पठाण, सय्यद नासेर सय्यद नुर, सय्यद शाहरूख सय्यद नुर, शेख उबेद शेख बाबू, शेख सरफराज उर्फ सरू डॉन, शेख शहेबाज शेख कलीम (रा. रोशनपुरा बीड), शेख अमर शेख अकबर (रा. गुलशन नगर बीड), शेख बबर शेख युसूफ (रा. खासबाग बीड), आवेज काझी (रा. काझी नगर बालेपीर बीड), शेख इम्रान उर्फ काला शेख रशीद (रा. काझी नगर बालेपीर बीड), शेख मझहर उर्फ काल्या उर्फ हाफ मर्डर शेख रहीम (रा. बांगर नाला बीड), बबर खान गुल मोहम्मद खान पठाण (रा.शहेबाज कॉलनी नेकनूर), शेख वसीम शेख बुऱ्हानोद्दीन (रा. रोशनपुरा बालेपीर बीड) या चौदा जणांना दोषी ठरवले आहे. या प्रकरणात एकूण १८ जणांविरूध्द गुन्हा दाखल झालेला असुन त्यापैकी १४ अटक असून तीन आरोपींना निर्दोष तर इम्रान पठाण उर्फ चड्डा हा फरार आहे.काही आरोपींना मोक्का अंतर्गत शिक्षा?तर काही आरोपींना खून केल्या प्रकरणी शिक्षा सूनावण्याची शक्यता आहे.

 

 

आनंद वीर

पत्रकार आणि पार्श्वभूमी दैनिकाचे जिल्हा प्रतिनिधी बातम्या व जाहिरातीसाठी थेट संपर्क करा - मो.: 8623880100 | ईमेल: veeranand478@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button