ताज्या घडामोडी

बीड शहरात एकास दिवसाढवळ्या लुटले !

सेवानिवृत्त इंजिनियरची सोन्याची चैन,अंगठी पळवली.

बीड शहरात मागील काही दिवसातील भर दिवसा भामट्यांनी लुटण्याची ही दुसरी घटना असून भाजी खरेदी करून घराकडे निघालेल्या सेवानिवृत्त इंजिनिअरला दोन भामट्यांनी दिवसाढवळ्या लुटले. यामुळे नागरिकात भीतीचे वातावर पसरले.’तुमच्या जवळील सोन्याची चैन व अंगठी काढून ठेवा’, असे म्हणत या चोरट्यांनी अंगठी व सोन्याची चैन चोरली. ही घटना आज चाणक्यपुरी भागात घडली.या आधी देखील एक वयोवृद्ध महिला घराकडे जात असताना दोन भामट्यांनी याच भागातील सोन्याचे दागिने काढून घेतले होते. बीड येथील सेवानिवृत्त इंजिनियर पोपटराव जोगदंड है दिनाक ५ डिसेंबर गुरुवार रोजी दुपारी आपल्या घराकडे चाणक्यपुरी येथून जात असताना दोन भामट्याने लुटण्याची माहिती पोलिसांना समजताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. सेवानिवृत्ती इंजिनिअर पोपटराव जोगदंड हे भाजी खरेदी करून घराकडे जात असताना चाणक्य पुरी जवळ त्यांना दोन भामटे भेटले. त्यांनी जोगदंड म्हटले की, ‘आम्ही प्रशासनाचे माणसं आहोत, सध्याची परिस्थिती खराब आहे, चोऱ्या वाढलेल्या आहेत, त्यामुळे तुमच्या गळ्यातील चैन, हातातील अंगठी काढून ठेवा,’ असे म्हटल्यानंतर जोगदंड यांनी चैन व अंगठी काढून ठेवली. हे दागिने हाथरुमालमध्ये गुंडाळून ठेवले.हाथरुमाल इकडे द्या, असे म्हणत चोरट्यांनी हातचालाखी करत चैन आणि अंगठी पळविली. आपल्याला दिवसाढवळ्या लुटण्यात आल्याचे जोगदंड यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन आजुबाजुच्या घरातील व दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासायला सुरुवात केली. दिवसाढवळ्या व रहदारीच्या ठिकाणी सोने लूटण्याची घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. चोराने दिवसा ढवळ्या सोने लुटून पोलिसाला एक प्रकारचे आव्हानच दिले आहे.रात्री उशिरापर्यंत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू होती.

 

आनंद वीर

पत्रकार आणि पार्श्वभूमी दैनिकाचे जिल्हा प्रतिनिधी बातम्या व जाहिरातीसाठी थेट संपर्क करा - मो.: 8623880100 | ईमेल: veeranand478@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button