
अंबाजोगाई, केज प्रतिनिधी
केज शहरातील कबीर नगर वार्ड क्रमांक 14 मधील रहिवाशांनी आपल्या परिसरातील घरांपासून अवघ्या 3 फूट अंतरावर असलेल्या 33 केव्ही विद्युत वाहिनीबाबत तक्रार केली होती. या धोकादायक लाईनमुळे अपघात होण्याची भीती निर्माण झाली होती. या लाईनला हटवण्याची किंवा उंची वाढवण्याची मागणी नागरिकांनी केली होती.
या मागणीची दखल घेत आमदार सौ. नमिताताई मुंदडा यांनी निवडणुकीनंतर अवघ्या काही दिवसांतच कार्यवाही केली. 5 डिसेंबर रोजी संबंधित कामाला सुरुवात करण्यात आली आणि या 33 केव्ही लाईनची उंची 15 फूट वाढवण्यात आली. या कामामुळे कबीर नगरमधील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
स्थानिक नागरिकांनी आमदार नमिताताई मुंदडा यांचे विशेष आभार मानले आहेत. त्यांच्या तात्काळ प्रतिसादामुळे आणि प्रभावी निर्णयक्षमतेमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.