डॉ.ओमप्रकाश शेटे त्यांनच्या डोळ्यात अश्रू का आले ?
डॉ.ओमप्रकाश शेटे यांनी जनआरोग्य सेवेच्या माध्यमातून दिला लाखो रुग्णांना लाभ

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल लागल्यावर भाजपने सर्वात जास्त जागी विजय मिळवल्याने भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाले होते. देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा पार पडत असताना ओम प्रकाश शेटे यांना आनंद अश्रू आले. देवेंद्र फडणवीस यांचे सहकारी ओमप्रकाश शेटे यांनी मागील पाच वर्षात रुग्णांना सेवा देण्यासाठी तत्परता दाखवत अनेक गोरगरीब रुग्णांना जनसेवा आरोग्याच्या माध्यमातून जीवनदान दिले.केंद्र शासनाची आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महाराष्ट्र शासनाच्या म. ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेच्या एकत्रित अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र शासनाने आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्राच्या कक्ष प्रमुखपदी डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांची नियुक्ती करण्यात आली होती.राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे विश्वासू डॉक्टर ओमप्रकाश शेटे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष व केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांचे सहाय्यक खासगी सचिव म्हणून केलल्या अनुभवाची व पुण्याईची शिदोरी गाठीशी असलेल्या ओमप्रकाश शेटे यांच्याकडून सर्वसामान्य व गरजवंत रुग्णांच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत.भाजप सरकारच्या कार्यकाळात मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून फडणवीस सरकारची सामाजिक प्रतिमा घराघरात पोहोचवण्याचे काम या कक्षानं केलं होतं. केवळ साडेसाचर वर्षात दिवसरात्र काम करत डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांनी महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात जास्त निधी सर्वसामान्य रुग्णांच्या उपचारासाठी पोहोचवण्याचे काम केले होते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रुग्णसेवेचा संदेश घेऊन राज्यभर आरोग्य शिबिरे भरवली होती.
कोण आहेत ओमप्रकाश शेटे?
तत्कालीन मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख होते. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षात असताना धर्मादाय व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे सदस्य म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे. त्यांच्या कार्यकाळामध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता व धर्मादायक किंवा महात्मा फुले योजनेतील लाभार्थ्यांना करोडो रुपयांचा लाभ झालेला आहे. डॉक्टर शेटे यांची खासियत म्हणजे सर्वपक्षीय संबंध, कोणताही पक्षीय भेदाभेद न करता, कुठलीही शिफारस न घेता प्राणाणिकपणे काम करणे. सर्वसामान्य रुग्णांना जात, धर्म, पंथ विरहित न्याय देण्याचा प्रयत्न त्यांच्या कार्यकाळात झाला. त्यामुळेच त्यांनी राज्यभरात देवदूत म्हणून ओळखले जात आहे. देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री पदाची शपथ घेत असल्याचे पाहून डॉ.ओम प्रकाश शेटे यांना आनंदअश्रू आले.