डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न.
रक्तदान करून केले आंबेडकरांना अभिवादन

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मनसेच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.
बीड (प्रतिनिधी):- महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मनसेच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मनसे जिल्हा सचिव सोमेश्वर राजकुमार कदम यांनी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांना अनोख्या पद्धतीने आदरांजली वाहण्यासाठी व सध्या जिल्हा रुग्णालयात असलेली रक्ताची कमतरता या पार्श्वभूमीवर
रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.सदर रक्तदान शिबिरास मनसे जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव बिडवे,p यांच्यासह अमरजान पठाण,विजय शिंदे,कार्तिक जव्हेरी,आकाश टाकळकर यांच्यासह मान्यवयांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून रक्तादान शिबिर सुरुवात केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सिद्धू धोंगडे यांनी केले तर आभार प्रदर्शन अजिंक्य मुळे यांनी मानले .जिल्हा रुग्णालय रक्तपेढी विभागाचे सचिन सतकर व त्यांच्या टीमने रक्तसंकलन केले.सदर रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी मनसे पदाधिकारी व मित्रपरिवार यांनी परिश्रम घेतले. यावेळी महिला नागरिक व मनसे कार्यकर्त्यांनी रक्तदान करून केले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना केले.अभिवादन.