मनोज जरांगे यांची नवीन सरकारला नवी डेडलाईन !
नव्या सरकारने नाटकबाजी बंद करून दिलेला शब्द पाळावा.. जरांगे पाटील

राज्यात विधानसभा निवडणूक मध्ये महायुतीला भरघोस यश प्राप्त झाल्याने महायुतीच्या महायुतीचे ५ डिसेंबर रोजी सरकार स्थापन झाले आहे. त्यांना आम्ही १ महिन्यांचा कालावधी देत आहोत, त्यांनी ५ जानेवारीपर्यत मराठा आरक्षण, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावे अन्यथा मराठा समाज पुन्हा संपूर्ण ताकदीने सरकीला परेशान करतील, असा इशारा मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मनोज जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले की, ‘वैचारिक मतभेद जरी असले तरी अभिनंदन करण्याची,शुभेच्छा देण्याची प्रथाच आहे. त्याप्रमाणे त्या तिघांचं खूप-खूप अभिनंदन. पण आता मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी मनोज जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले की, ‘वैचारिक मतभेद जरी असले तरी अभिनंदन करण्याची, शुभेच्छा देण्याची प्रथाच आहे.त्याप्रमाणे त्या तिघांचं खूप-खूप अभिनंदन. पण आता मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी सुरुवात करायची.नाटकबाजी बंद करायची असेही त्यांनी म्हटले आहे. मनोज जरांगे म्हणाले की,सरकार स्थापन झाले आहे,जनतेचे प्रश्न मार्गी काढणे गरजेचे आहे. समाजात जी खदखद आहे, ती त्यांना दिसत नसेल पण इतकी भयंकर सुप्त लाट आहे, ते परेशान होतील. काल सरकार स्थापन झाल्यावर त्यांना तिघांना आम्ही शुभेच्छा दिल्या आहेत. आता त्यांनी गोरगरिबांचे प्रश्न मार्गी लावले पाहिजे. ५ जानेवारीपर्यत त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढावा. नसता हे मराठे तुफान ताकदीने आंदोलनात उभे राहून सरकारला परेशान करणार आहेत, सोडणार नाही. २००४ चा अध्यादेशामध्ये दुरुस्ती करायची, सगे सोयरेची अंमलबजावणी करायची यासोबतच तिन्ही गॅझेट आणि लाखो पोरांवर झालेल्या केसेस मागे घ्याव्यात. मनोज जरांगे पुढे म्हणाले की, आमच्या ज्या ८ ९ मागण्या पूर्वीच्या सरकारकडे आम्ही मागितल्या होत्या त्या यांनी मार्गी काढाव्या,तेव्हाही हेच सरकार होते.नसता पुन्हा मराठा समाजाच्या पुढे त्यांना जायचे आहे.गुर्मी, झाकी,अन् मस्तीत सरकारने जगू नये असे म्हणत सरकारला इशारा दिला आहे.