
बीड शहरातील धोंडीपुरा,काळे गल्ली भागात राहणारे वैभव वैद्य वय 37 वर्षे यांचे दिनांक 7 डिसेंबर रोजी मुंबई येथे उपचार दरम्यान मृत्यू झाला. वैभव वैद्य यांनी द्वारकाधीश मित्र मंडळाच्या माध्यमातून अनेक गोरगरिबांना मदत केल्याने ते सर्वत्र परिचित होते. द्वारकाधीश मित्र मंडळाचे परशुराम भैय्या गुरखुदे यांचे जवळचे सहकारी मित्र व कट्टर समर्थक म्हणून देखील वैभव वैद्य यांची ओळख होती. वैभव वैद्य याना आजारी असल्याने बीड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते परंतु, प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना मुंबई येथील जुपिटर हॉस्पिटल ठाणे या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होता, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली.वैभव वैद्य यांच्या अकाली निधनाने मित्र परिवाराना नातेवाईकावर धक्का बसला असून त्यांच्यावर मोंढा रोड येथील अमरधाम स्मशान भूमीत पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.