ताज्या घडामोडी

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून !

अपहरणा नंतर काही तासातच आढळला मृतदेह.

 

केज तालुक्यातील मस्साजोग येथील युवा नेतृत्व व माजी सरपंच पती संतोष देशमुख यांचे काही अज्ञाताने दुपारी अपहरण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर काही तासांतच संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला असल्याने खळबळ उडाली असून कर्तृत्वान तरुण तडफदार नेतृत्व युवांचा सोनापती कार्यकर्ता गेल्याने मस्साजोग व तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.या बाबत माहिती अशी की, संतोष देशमुख व त्यांचा वाहन चालक हे चारचाकी गाडीतून मस्साजोग कडे जात असताना डोणगाव जवळ दोन वाहनातून येऊन अज्ञात व्यक्तींनी गाडी अडवून गाडीची तोडफोड करून केली व संतोष देशमुख यांचे अपहरण केले असल्याची तक्रार केज पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती मात्र काही तासानंतर बोरगाव- दहीटना रस्त्यावर संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला असल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांचा मतृदेह केज उपजिल्हा रुग्णालयात पोस्टमार्टन साठी दाखल करण्यात आला आहे 

 

संतोष देशमुख हे त्यांच्या अनेक चांगल्या कार्यामुळे तालुक्यात परिचित होते.मस्साजोग ग्रामपंचायतला अनेक माध्यमांमधून वेगवेगळे पुरस्कार मिळवून दिले आहेत.युवा नेतृत्वाचा अपहरण होऊन काही तासातच मृतदेह आढळल्याने केज तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमका हा प्रकार कसा व का घडला याचा तपास केज पोलीस करत आहेत.कार्यकृत्याची प्रचंड प्रमाणात गर्दी केज उपजिल्हा रुग्णालयात व केज पोलीस स्टेशन समोर जमली आहे.अनेक तर्क विर्तक लावले जात आहेत नेमके मृत्यूचे कारण कळू शकले नाही

 

 

आनंद वीर

पत्रकार आणि पार्श्वभूमी दैनिकाचे जिल्हा प्रतिनिधी बातम्या व जाहिरातीसाठी थेट संपर्क करा - मो.: 8623880100 | ईमेल: veeranand478@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button