ताज्या घडामोडी

सरपंच खून प्रकरणात पवनचक्की कॉन्ट्रॅक्टरवर खुनाचा गुन्हा दाखल करावा.सचिन मुळूक,स्वप्निल गलधर.

बीड (प्रतिनिधी) केज तालुक्यातील मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांचे आज अपहरण करुन त्यांचा खुन केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणामागे पवनचक्की उभारणाऱ्या कंपनीच्या अिधकाऱ्यांचा व कॉन्ट्रॅक्टरचाहात असू शकतो पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून कंपनी व कॉन्ट्रॅक्टर वर खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, स्वप्नील गलधर यांनी केला आहे.जिल्ह्यामध्ये पवनचक्की उभारण्याचे काम एका कंपनीकडून सुरू आहे. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पवनचक्की उभारल्या जात आहेत. यासाठी संबंधीत कंपनीकडून शेतकऱ्यांना नियमानुसार जमिनीचा मावेजा देणे बंधनकारक आहे. मात्र बीड जिल्ह्यात पवनचक्की कंपनीच्या अिधकाऱ्यांची मनमानी सुरू आहे. जिल्हाभरात पवनचक्की उभारण्याचे काम सुरू असून पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना जमिनीचा मावेजा दिला जात नाही. शेतकऱ्यांनी मावेजा मागितला तर स्थानिक गुंडांकडून धमकावण्याचे प्रकार घडत आहेत. तसेच शेतकऱ्यांनी मावेजासाठी पवनचक्कीचे काम अडविले तर पवनचक्की उभारणााऱ्या कंपनीचे अधिकारी उलट शेतकऱ्यांनाच जेलमध्ये टाकण्याची धमकी देतात. असल्याचा आरोप मुळूक, गलधर यांनी केला आहे. दरम्यान केज तालुक्यातील मस्सजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांचे दोन दिवसांपूर्वी पवनचक्की उभारणाऱ्या कंपनीच्या अिधकाऱ्यांसोबत वाद झाल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी गुन्हाही नोंद झाला आहे. या घटनेला दोन दिवसांचा कालावधी झाल्यानंतर आज डोणगाव परिसरातून संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यात आले. यानंतर बोरगाव-दैठण रस्त्यावर त्यांचा मृतदेह आढळून आला. या खुनामागे पवनचक्की उभारणाऱ्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचा व कॉन्ट्रॅक्टरचा हात असण्याची शक्यता असून पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून कंपनी व कॉन्ट्रॅक्टर वर कुणाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी मुळूक, गलधर यांनी केला आहे.

आनंद वीर

पत्रकार आणि पार्श्वभूमी दैनिकाचे जिल्हा प्रतिनिधी बातम्या व जाहिरातीसाठी थेट संपर्क करा - मो.: 8623880100 | ईमेल: veeranand478@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button