सरपंचाच्या हत्येमागे मुख्य सूत्रधार कोण ? बीडचा बिहार झाला खा.बजरंग सोनवणे
भरदुपारी अपहरण,खून झाल्याने जिल्हा हादरला.

केज तालुक्यातील मस्साजोग येथील युवा नेतृत्व व माजी सरपंच पती संतोष देशमुख यांचे काही अज्ञाताने दिनांक ९ डिसेंबर रोजी दुपारी अपहरण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर काही तासांतच संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला असल्याने खळबळ उडाली असून कर्तृत्वान तरुण तडफदार नेतृत्व युवां कार्यकर्ताचा असे भरदुपारी अपहरण करून खून करण्यात आल्याने बीड जिल्हा हादरला असून या हत्येचा खासदार बजरंग सोनवणे यांनी निषेध केला. या घटनेमुळे मस्साजोग व तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. संतोष देशमुख व त्यांचा वाहन चालक हे दुपारी चारचाकी गाडीतून मस्साजोगकडे जात असताना डोणगावजवळ दोन वाहनातून येऊन अज्ञात व्यक्तींनी गाडी अडवून फिल्मी स्टाईलने गाडीची तोडफोड करत संतोष देशमुख यांचे अपहरण करून काही तासानंतर बोरगाव- दहीटना रस्त्यावर संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला असल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांचा मतृदेह केज उपजिल्हा रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी दाखल करण्यात आला आहे. संतोष देशमुख यांनी मस्साजोग ग्रामपंचायतला अनेक माध्यमांमधून वेगवेगळे पुरस्कार मिळवून दिले आहेत. कार्यकर्त्यांची प्रचंड प्रमाणात गर्दी केज उपजिल्हा रुग्णालयात व केज पोलीस स्टेशन समोर जमली होती.वादाची पार्श्वभूमी अशी की मस्साजोग येथे अवादा कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पाच्या कार्यालयात, टाकळी येथील सुदर्शन घुले व त्याच्या साथीदारांनी शुक्रवारी (६ डिसेंबर) अधिकारी व कर्मचाऱ्यांना मारहाण केली होती. याप्रकरणी सुदर्शन घुले यांच्यासह चौघांवर केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पवनचक्की कार्यालयात काम करणाऱ्या मस्साजोग येथील कर्मचाऱ्यांची बाजू घेत सरपंच संतोष देशमुख यांनी हस्तक्षेप केला होता. याचा राग मनात धरून त्यांचे अपहरण करून खून करण्यात आला असावा असा संशय व्यक्त होत आहे.
बीडचा बिहार झाला – खा. बजरंग सोनवणे
सरपंचांना गाडीत टाकून नेले आणि खून केला ही घटना ह्र अत्यंत दुर्दैवी व प्रचंड वेदना देणारी आहे. पवनचक्कीच्या खंडणी प्रकरणात झालेला खून व त्या मागे कोणाचा हात आहे हे शोधले पाहिजे. बीडचे पोलीस अधीक्षक जर फोन उचलणार नसतील तर गंभीर बाब आहे. आपण सदरील प्रश्न लोकसभेत उपस्थित करणार असून झालेला खून हा बीड पोलीस यंत्रणेवर प्रश्न उपस्थित करणारा आहे. या संदर्भात एक व्हिडीओ प्रसारीत करून खा. वजरंग सोनवणे यांनी पोलिसांच्या कायदा व सुव्यवस्थे विरुद्ध नाराजी व्यक्त करत या खुना मागील मुख्य सूत्रधार कोण है पोलिसांनी शोधून त्याला कठोर शासन करावे अशी मागणी केली आहे.