ताज्या घडामोडी

सरपंच खून प्रकरणातील दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात !

सर्व आरोपींना 24 तासाच्या आत ताब्यात घेण्यात येईल...अ.पो.अधीक्षक सचिन पांडकर

 केज तालुक्यातील मस्साजोगचे माजी सरपंच संतोष पंडीतराव देशमुख यांचे अपहरण करून खून केल्याची घटना घडली होती. दिवसा अपहरण व खून या घटनेमुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली होती. नातेवाईकांनी केज येथे रुग्णालय व पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. या प्रकरणातील आरोपींना अटक केल्याशिवाय प्रेत ताब्यात घेणार नाही असा पवित्र नातेवाईक यांनी घेतल्याने काही काळ परिस्थिती तणावाच निर्माण झाली होती. आज तेच शहरातील व्यापारी व नागरिकांनी केज शहर बंद ठेवून रस्ता रोको करण्यात आला.  त्यामुळे पोलीस अधीक्षक यांनी तपासाची चक्रे फिरवून या प्रकरणात संशयित दोघांना अटक केल्याची माहिती प्रभारी पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी मंगळवारी (दि.10) दिली.संतोष देशमुख यांचा खून आरोपी सुदर्शन घुले (रा. टाकळी ता. केज) व इतर पाच आरोपींनी अपहरण करुन खून केल्याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात 637/2024 कलम 140 (1), 126, 118(1), 324(4) (5), 189 (2), 191(2), 190 भा.न्या.सं. प्रमाणे गुन्हा दाखल आहे. या घटनेचे गांभिय लक्षात घेऊन अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई चेतना तिडके यांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख, पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन पोलीस यांना योग्य त्या सुचना देऊन आरोपींचे शोध कामी तात्काळ पथके रवाना केली. या गुन्हयातील आरोपींचा वाशी, धाराशिव परीसरात शोध घेत जयराम माणिक चाटे (वय 21 रा.तांबवा ता. केज), महेश सखाराम केदार (वय 21 वर्षे रा. मैंदवाडी ता.धारुर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.आरोपींना विश्वासात घेऊन इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.या गुन्हयात सहभाग असलेल्यावर कडक कायदेशिर कारवाई करण्यात येणार असुन नागरीकांनी अफवावर विश्वास ठेवु नये असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी केले आहे.ही कारवाई कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, अपर अधीक्षक चेतना तिडके, सहायक पोलीस अधीक्षक कमलेश मिना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उस्मान शेख, प्रशांत महाजन, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन केज, पोउपनि विघ्ने, औताडे, जाधव, शेलार, हंगे, कोरडे स्था.गु.शा. बीड यांनी सदरची कारवाई केली आहे.

आनंद वीर

पत्रकार आणि पार्श्वभूमी दैनिकाचे जिल्हा प्रतिनिधी बातम्या व जाहिरातीसाठी थेट संपर्क करा - मो.: 8623880100 | ईमेल: veeranand478@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button