सरपंच देशमुख खून प्रकरणी सीआयडी चौकशी होणार !
PSI पाटील निलंबित तर पो.नि. महाजनाच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठवला.

केज मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे भर दिवसा अपहरण करून काही तासातच मृतदेह आढळल्याने बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. कायदा व सुव्यवस्थेच धाक राहिला नसल्याचे यावरून दिसत आहे. आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता, केज मध्ये काल सकाळपासूनच रस्ता रोको करण्यात आला होता. या घटनेची माहिती मिळताच मनोज जरांगे पाटील केज शहरात दाखल होत रस्तारोको मध्ये सामील होत. बीड पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ हे देखील मसाजोग येथे रस्ता रोको ठिकाणी येऊन हजर झाले. जरांगे पाटील यांनी पोलीस अधीक्षकाकडे आरोपींना तात्काळ अटक करावे,या संबंधित जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांची निलंबन करावे, विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करावी, अपहरण व खून प्रथमदर्शित साक्षीदार असलेल्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, अपरण व हत्या करणाऱ्यांना जामीनसाठी मदत करण्यास सहआरोपी करावे व अपहरन व हत्याची सीआयडी मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी मस्साजोग ग्रामस्थ व मनोज जरांगे पाटील यांनी बीड पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्याकडे केली.PSI पाटील यांना निलंबन केल्याची सांगितले तर पोलीस निरीक्षक महाजन यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे पाठवण्याची माहिती दिली. या हत्येची सीआयडी मार्फत चौकशी करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे देखील सांगितले.है सरकार छळ करत असल्याचा आरोप जरांगे यांनी केला.यावेळी मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री सह स्थानिक नेत्यांना या हत्येची सखोल चौकशी करून हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशी देण्यात यावी अशी मागणी केली.