सरपंच खून प्रकरणातील तिसरा आरोपी पोलिसांच्या ताब्यात !
खूनाचा सीआयडीमार्फत तपास होणार.

केज.मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून करण्यात आला होता हा घटनेने जिल्हा हादरला. आरोपींना तात्कळा अटक करण्यासाठी मसाजोग व केज मध्ये जवळपास आठ तास रस्ता रोको करणार आला होता.तसेच एक बस देखील पेटवून देण्यात आल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. बीड पोलीस अधीक्षकाणी केज येथे जावून आरोपीला अटक करण्याचे आश्वासन दिले व केस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक यांना निलंबनात करण्याचा अहवाल पाठवला.या प्रकरणात तपासात पोलिसांनी दुपारी 2 आरोपीना ताब्यात घेतले होते.आज आणखी एका आरोपीस बीड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पुण्यात प्रतिक भीमराव घुले (वय २५, रा. टाकळी, ता. केज) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. खून केल्यानंतर प्रतिक घुले पुण्याच्या दिशेने रवाना झाल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या अचूक माहितीच्या आधारे पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. पोलिसांनी यापूर्वी जयराम माणिक चाटे (वय २१ रा. तांबवा ता. केज), महेश सखाराम केदार (वय २१ रा. मैंदवाडी ता. धारुर) या दोन आरोपींना अटक केली होती. आतापर्यंत एकूण तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. दरम्यान, प्रतिक भीमराव घुले वय 25 रा. टाकळी केज यास याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुण्यातून अटक केली आज बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती आहे. उर्वरित तीन आरोपींचा शोध घेऊन ताब्यात घेणार असल्याचे बीड पोलीस अधीक्षक यांनी माहिती दिली.