प्रशासन व सत्ताधाऱ्यांना हाताशी धरून बीडचा बिहार केला जातोय..आ.संदीप क्षीरसागर
आरोपी व पोलीस अधिकारी यांची कॉल डिटेल तपासा सत्यसमोर येईल.

बीड : मस्साजोग येथील सरपंच देशमुख यांच्या खून प्रकरणानंतर आज बीड विधानसभेचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी त्याठिकाणी भेट दिली. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, बीड जिल्ह्यातील प्रशासन व सत्ताधाऱ्यांना हाताशी धरून बीड जिल्ह्याचे बिहार केले जात आहे, विशेष म्हणजे वाल्मिक कराड यांच्यासाठी तर पोलीस स्टेशन घरासारखे असल्याचेही ते म्हणाले. परळीतील व्यापाऱ्याकडे वर्षानू वर्ष असलेल्या विविध एजन्सी ह्या धमकवून आपल्या कार्यकर्त्याला दिल्या जात आहेत. केज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होण्यास टाळाटाळ झाल्यानेच देशमुख यांचे अपहरण व खून झाला असल्याचा आरोप आ.संदीप क्षीरसागर यांनी केला.या प्रकरणात हिवाळी अधिवेशनात विधानसभेत यासंदर्भात आवाज उठवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पवनचक्कीच्या वादातून ९ डिसेंबर रोजी केज तालुक्यातील मासाजोगचे माजी सरपंच संतोष पंडीतराव देशमुख यांचा खून केल्याची घटना घडली होती. या प्रकणातील तीन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. विशेष म्हणजे ग्रामस्थांनी रस्तारोको केल्यानंतर पोलीसयंत्रणा कामाला लागली. यामध्ये संबंधित दोन अधिकाऱ्यांपैकी एक अधिकाऱ्याचे निलंबन तर दुसऱ्या अधिकाऱ्यावर निलंबनाची टांगती तलवार आहे. वर्दीतील अधिकारीच जर कामात कसूर करत असतील तर जिल्ह्यात होणारे गैरप्रकार कसे रोखले जातील, दरवेळेसच रस्त्यावर उतरूनच न्याय मागण्याची वेळ येत असेल तर सर्वसामान्यांना न्याय कसा मिळणार? यासह असंख्य प्रश्न पोलीस प्रशासनाच्या कामकाजावर उपस्थित होत आहे.बीड जिल्ह्यात पोलीस अधीक्षक म्हणून लोकसभा निवडणूकीनंतर अविनाश बारगळ यांनी जिल्ह्याचा पदभार स्विकारला परंतु ते आल्यापासून जिल्ह्यात अवैध धंद्याचा सुळसुळाट वाढला आहे. तसेच मागील एका महिन्यापासून हा तिसरा खून असून दरोडे, चोऱ्या माफीयाराज, अवैध वाळू व उपसा वाहतूक सुरू आहे. यामुळे जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नेहमीच उपस्थित होवू लागला आहे. नुकत्याच झालेल्या सरपंच खूनप्रकरणानंतर पोलीस प्रशासन संशयाच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त होत आहे.आज आ.संदीप क्षीरसागर यांनी मस्साजोगला देशमुख कुटुंबीयांची भेट देत पोलीस प्रशासनावर संशय घेत या प्रकरणातील संबंधित पोलीस अधिकारी व एसपींचे कॉल रेकॉर्ड तपासा यातील मास्टरमाईक कोण आहे? व या खुना मागील मास्टर माईंडचा शोध लावून, बीड पोलीस अधीक्षकासह केज येथील सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे व आरोपींचे कॉल डिटेल्स तपासले तर सत्य नक्कीच नक्कीच समोर येईल. दिवसाढवळ्या अपहरण व खून झाल्याने जिल्हा दहशतीखाली एखाद्याने विरोधात बोलला तर त्याच्यावर 360 सारखा गंभीर गुन्हा दाखल खिशात गुन्हा हा एका चॉकलेट सारखा झाला आहे. रामकृष्ण बांगरच्या संस्था हडप करण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांवर ३०७ सारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले हे गुन्हे कोणाच्या दबावाखाली दाखल करण्यात आले हे देखील पोलिसांनी सांगावे. बीड जिल्हा शांतता करायचा असेल तर या खुनातील आरोपींना व त्यामागील मास्टर माईंडना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा द्यावी अशी असे मत माध्यमांशी बोलताना आ. संदीप श्रीरसागर यांनी व्यक्त केले.