सरपंच देशमुख यांच्या खुनाची CID चौकशी करून मुख्य सूत्रधाराला अटक करा. मुळूक,गलधर
कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी आरोपींना तात्काळ अटक करा.

केज येथील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे दिवसा ढवळ्या अपरहन करून खून करण्यात आला. या घटनेने बीड जिल्हा हादरला असून, जिल्ह्यातील नागरिक दहशतीखाली आहेत.यातिल आरोपीचा अध्यापही बीड पोलिसांना शोध लावता आला नाही. त्यामुळे केज मसाजोग मध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. संतोष देशमुख यांच्या हत्येची C.I.D मार्फत तपास करून मुख्य सुत्रधारास अटक करावे. यातील आरोपींना तात्काळ अटक झाली तरच बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिलं. ये हत्ये मधील आरोपी व या मागील मुख्य सूत्रधार मास्टर माईंड यांना अटक करावे अशी मागणी शिवसेना शिंदे गड जिल्हाप्रमुख सचिन मुळक व स्वप्नील गलधर यांनी केली आहे. हत्येच्या दोन दिवस आधी आरोपी व मयत संतोष देशमुख यांच्यात वाद झाला होता. परंतु त्यावेळी पोलिसांनी आरोपीवर थातूर-मातूर कारवाई करून आरोपीला पाठीशी घातले त्यानंतर दोनचं दिवसांनी सरपंच संतोष देशमुख यांची दिवसाढवळ्या कट रचून अपहरण करून निर्घणपणे हत्या केली गेली. या हत्येमागे कोणाकोणाचा हात आहे. हे शोधण्यासाठी या गुन्ह्याचा तपास C.I.D कडे देऊन मुख्य सुत्रधारास अटक करण्यात यावी अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक व स्वप्निल गलधर यांनी केले आहे.