मस्साजोग घटना घृणास्पद,हत्ये मागील मास्टरमाईंड शोधा..डॉ.ज्योतीताई मेटे.
देशमुख कुटुंबीयांच्या सोबत शिवसंग्राम खंबीरपणे उभी.

बीड (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यात धक्कादायक व गंभीर घटना घडली आहे. केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच, सामाजीक कार्यात सतत सहभागी असनारे संतोष देशमुख यांचे अपहरण करून हात्या करण्यात आलेला आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने हे अत्यंत गंभीर घटना असून या बाबत आरोपींवर कठोरात कठोर कारवाई व्हायला हवी. तसेच घटनेचा मास्टरमाइंड शोधणे आणि अशा घटनांची पुनरावृत्ती न होणे यासाठी प्रशासनाने कडक उपाययोजना करणे गरजेचे आहे असे मत देशमुख कुटुंबियांच्या भेटी दरम्यान शिवसंग्राम अध्यक्ष डॉ. ज्योती मेटे यांनी व्यक्त केले.बीड जिल्हा हा संतांचा जिल्हा म्हणून पूर्वी ओळखला जात होता. अख्या भारतामध्ये सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणून ओळख असलेल्या राज्यात आता बीड जिल्ह्यात ही हत्या होणे हा कलंक आहे. महाराष्ट्राच्या गृह विभागाने गांभीर्याने जागे होऊन या विषयात लक्ष दिले पाहिजे. जिल्ह्यामध्ये सातत्याने खून, गोळीबार ,खंडणी यासारखे गंभीर गुन्हे घडत आहेत. यात पोलीस प्रशासनाचे गुप्तचर विभाग काय करतो असा प्रश्न पडत आहे. त्याचबरोबर संपूर्ण पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. मस्साजोग येथील घटना दुर्दैवी आहेच परंतु अशा प्रकारच्या घटना घडू नये याकरिता प्रशासनाने आणि पोलीस प्रशासनाने कठोर उपाययोजना करणे गरजेचे आहे. तसेच शिवसंग्राम देशमुख कुटुंबियांच्या खंबीर पने पाठीशी आहे असे डॉ. ज्योती मेटे यांनी म्हंटले आहे. याप्रसंगी शिवसंग्राम प्रदेश उपाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे, नितीन लाठकर, नामदेव गायकवाड,धनेश गोरे, बाळासाहेब गलांडे , पंडित माने, बाळासाहेब हावळे, डॉ.सोमनाथ मेटे, ज्ञानेश्वर कोकाटे ,सचिन कळकुटे, मनोज जाधव, नितीन ताठे, साक्षी हांगे ,विजय सुपेकर, पांडुरंग बहिर, मंगेश माने , आण्णासाहेब खोसे ,राजेंद्र माने, सुनील कुटे आदी उपस्थित होते.