ताज्या घडामोडी

वाल्मीक(अण्णा)कराडसह तिघांवर खंडणीचा गुन्हा दाखल !

पवनचक्की अधिकाऱ्याकडे दोन कोटी रुपये खंडणीची मागणी..

 बीड पोलीस अधीक्षक पदी अविनाश बारगळ यांनी पदभार घेतल्यापासून कायदा व सुव्यवस्था बिघडली आल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. गेल्या एक महिन्यातील हा चौथा खून असल्याने पोलिसांचा गुंडावर कसलाच धाक नसल्याने दिवसाढवळ्या अपरहन व खूप होत आहेत. गुंडा प्रवर्तीच्यां लोकांना प्रत्यक्ष,अप्रत्यक्षरीत्या पोलीसच पाठबळ देत असल्याने, पोलिसाचे लागेबांधे असल्याने अपहरण,खून व मारामारी अशा घटनात वाढ होत आहे.दोन दिवसापूर्वी मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे दिवसाढवळ्या अपहरण करून खून करण्यात आला.ही हत्या पवनचक्कीच्या वादातून झाली असल्याची माहिती समोर आली असून परळीचे आ.धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्या सह राष्ट्रवादीच्या केज तालुकाध्यक्षवर दोन कोटी रुपये खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मस्साजोग येथील अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकावत असल्याची तक्रार केली असून संबंधित अधिकाऱ्यांचे अपहरण करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आलेली असल्याची तक्रार अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केज पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यामुळे केज पोलिसांनी वाल्मिक कराड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटे व मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाचा गुन्हा दाखल असलेला सुदर्शन घुले या तिघा जणावर खंडणीचा व जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या बाबत मस्साजोग येथील अवादा कंपनीचे अधिकारी सुनिल केटु शिंदे यांनी फिर्याद नोंदवली आहे. त्यानुसार दि. २९ नोव्हेंबर रोजी मस्साजोग येथील अवादा प्रकल्पाचे कार्यालयात हजर असतांना  एकाचा फोन आला, आरे ते काम बंद करा, ज्या परिस्थीतीमध्ये सुदर्शनने सांगीतले आहे, त्या परिस्थितीत काम बंद करा, अन्यथा त्याचे परिणाम गंभीर होतील अशी धमकी दिली. तसेच काही दिवसापुर्वी शिवाजी थोपटे यांना वाल्मीक आण्णा कराड यांनी त्यांचे परळी येथील कार्यालयात बोलावून अवादा कंपनीचे केज तालुक्यातील सर्व काम बंद करा अन्यथा काम चालु ठेवायचे असेल तर २ करोड रुपये द्या असे सांगीतले होते. त्यानंतर वेळोवेळी विविध लोकांचे मोबाईल बरुन प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या प्रकल्पाचे काम बंद न ठेवल्यास मारहान करण्याच्या व जीने मारण्याच्या धमक्या दिल्या. पवनचक्की प्रकल्पाचे काम चालु झाल्यापासून ते लोक धमकी देत आहेत. त्यामुळे त्यांचे कर्मचारी, अधिकारी दहशतीखाली असल्याने कपंनीचे वरिष्ठ पदाधिकारी यांचेशी चर्चा करून त्यांचे सल्ल्याने केज पोलीस ठाण्यात वाल्मीक कराड सह दोघांवर खंडणी व धमकावल्या प्रकरणी उशिराने तक्रार दाखल केली आहे.या प्रकरणी केज पोलीस अधिक तपास करत आहेत.धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाचे नाव खंडणी प्रकरणात आल्याने याची जिल्हाभर चर्चा होत आहे.

आनंद वीर

पत्रकार आणि पार्श्वभूमी दैनिकाचे जिल्हा प्रतिनिधी बातम्या व जाहिरातीसाठी थेट संपर्क करा - मो.: 8623880100 | ईमेल: veeranand478@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button