बीड जिल्हा बंद ! हत्येतील इतर आरोपीचा शोध घेण्यास बीड पोलीस अपयशी.
सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी जिल्हा बंदची हाक.

बीड जिल्ह्यामध्ये मागील काही महिन्यापासून गुंडगिरी वाढल्याचे दिसत आहे. बीड जिल्ह्यात मारामाऱ्या,खून,दरोडे च्या गुन्ह्यात वाढ झाल्याने. गुंडगिरी करणाऱ्या वर बीड पोलिसांचा यावर वचक नसल्यानेच अशा घटना वाढ झाली. मस्साजोग येतील पवनचक्की च्या कार्यालयामध्ये गेल्या आठवड्यात शूल्लक कारणावरून मारामारीची घटना घडली होती. त्याचेच कारण काढत सहा सात लोकांनी संतोष देशमुख यांचे दिवसाढवळ्या अपहरण करून खून करण्यात आला होता त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. या हत्यामागील मुख्य सूत्रधाराचा शोध घ्यावा, हत्येचा तपास सीआयडी मार्फत करावा अशी मागणी देशमुख कुटुंबीय, मसाजोग येथील नागरिक व जिल्ह्यातील नेत्यांनी केली होती. यातील तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. परंतु इतर आरोपीचा शोध घेण्यासाठी बीड पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी तीन दिवसात सर्व आरोपींना पोलीस ताब्यात घेतली असे आश्वासन रस्ता रोको करणाऱ्या नागरिकांना दिला होता, परंतु तीन दिवस झाले तरीही इतर आरोपीचा बीड पोलिसांना शोध लावता आला नसल्याने आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली असून अत्यावश्यक सेवा वगळता बीड जिल्ह्यात बंद पाळण्यात येणार असल्याचे सकल मराठा समाजाकडून आवाहन करण्यात आले आहे.