एक कोटीचा गुटखा वाहतूक शाखेने पकडला.
अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांनी घेतली झोपेची सोंग.

आनंद वीर(प्रतिनिधी)महाराष्ट्रात तंबाखूजन्य पदार्थ गुटख्यावर बंदी असताना देखील बीड जिल्ह्यात मात्र गुटखा विक्री सर्रास होताना दिसत याकडे अन्न व औषध प्रशासन अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. बीड येथील अन्न व औषध प्रशासन कार्यालय फक्त नावालाच आहे का असाच सर्वसामान्य नागरिकाला प्रश्न पडला हॉटेल, टपरी, किराणा दुकानात सहजपणे गुटख उपलब्ध होत आहे. याकडे अन्न व औषध प्रसाद अधिकारी यांनी लक्ष देऊन कारवाई करण्याची गरज आहे. वाहतूक शाखेचे सपोनि सुभाष सानप यांनी रात्री माजलगाव रोडवर नित्रुडजवळ एक कंटेनर थांबवून झडती घेतली असता यामध्ये राजनिवास गुटखा आणि सुगंधित तंबाखू मिळून आला. १ कोटी ४ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त१ कोटी पेक्षा जास्तीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.स.पो.नि.सुभाष सानप यांनी मागे गोदापात्रात अनेक कारवाया करून वाळू माफियांना सळो की, पळो करुन सोडले होते. आता त्यांनी इतरही अवैध धंद्यांकडे लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी सायंकाळी एक कंटेनर गुटखा घेऊन येत असल्याची माहिती सपोनि सुभाष सानप यांना मिळाली असता गुरुवारी सायंकाळी माजलगाव रोडवर नित्रुडजवळ संशयित कंटेनर थांबवून झडती घेतली असता यामध्ये महाराष्ट्रात बंदी असलेला राजनिवास गुटखा आणि सुगंधित तंबाखू असे साहित्य मिळून आले. कंटेनर सह हा सर्व १ कोटी ४ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी चालक सलमान फखरोद्दीन खान, गफ्फार शेख या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.