
बार्शी रोड वरील सह्याद्री हॉटेल समोर सिमेंट मिक्सर ट्रक व दुचाकीचा अपघात आज सायंकाळी सात वाजता झाला. या अपघातात दुचाकीवरील दोघे जखमी झाले असून त्यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी बीड मधील खाजगी रुग्णालय दाखल करण्यात आले. सिमेंट मिक्सर ट्रक क्रमांक MH 43E3903 हा शिवराज चौकाकडे जात असताना अचानक ब्रेक मारल्याने पाठीमागून दुचाकी क्र. MH 23 BA 5575 ने धडक दिल्याने दुचाकी वरील दोघे जखमी होऊन डोक्याला व पायाला मार लागल्याने त्यांना नागरिकांनी उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले. या अपघातामुळे बार्शी रोडवर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. जखमेची नावे मात्र समजू शकली नाहीत.