एस.पी.व PI महाजन यांना बांगड्याचा हार पोहोच करणार..स्वप्निल गलधर
राजकीय वरदहस्त असल्याने सरपंच हत्येतील आरोपी मोकाटच.

केज तालुक्यातील मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख अपहरण करून अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. हत्येतील तीन आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर आरोपी अद्यापही फरार असल्याने पोलिसांच्या कार्य पद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.या प्रकरणात अनेक लोकप्रनिधिनी देशमुख कुटुंबीयाची भेट देत आहेत.पोलिसांनी वेळीच या प्रकरणांत तत्काळ दखल घेतली असती तर देशमुख यांचे प्राण वाचले असते.या हत्या प्रकरणी आरोपी,पोलीस अधिकारी व पोलीस अधीक्षक यांचे कॉल डिटेल्स तपासून मुख्य सूत्रधार व पोलिसांना सह आरोपी करावे अशी मागणी देशमुख कुटूंब ,मस्साजोग येथिल नागरिक व लोकप्रतिनिधींनी केली. या प्रकरणात आरोप असलेले केजचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठविष्यात आले आहे. त्यांचा अतिरिक्त पदभार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. बीड जिल्ह्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या महिलांवरील अत्याधार, बेसुमार अवैध धंदे यामुळे बीड जिल्हा पोलीस दलांवर संशय व्यक्त होत आहेत. तसेच जिल्ह्यातील वर्दीचा धाक राहिलेला दिसत नाही, यामुळे एसपीसाहेब राजकीय दबावाला झुगारत वर्दीची लाज राखा व सुस्त झालेले पोलीसानी तत्काळ यातील आरोपींना अटक करून निक्षपपाती तपास करण्यात यावा अशी मागणी होत आहे.या हत्या करणारे आरोपीचा तपास लावून यातील मुख्य सुत्रधार याना ताब्यात घेतले नाही तर स्वप्नील एस.पी. व केज पोलीस ठाण्याचे संबंधित पी.आय यांना बांगड्यांचा हार शिवसेना स्टाईल पोहोच करणार असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख स्वप्निल गलधर यांनी सांगितले.