पंकजा मुंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश !

महत्त्वाची राजकीय घडामोडभाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर येत आहे. राज्याच्या राजकीय वर्तुळात यामुळे चर्चांना उधाण आले आहे.पंकजा मुंडे या भाजपच्या प्रभावशाली नेत्यांपैकी एक असून, गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वारशाची धुरा त्यांनी समर्थपणे सांभाळली आहे. यापूर्वीही त्यांनी ग्रामविकास मंत्री म्हणून कार्य केले आहे. गेल्या काही काळात त्या पक्षाच्या अंतर्गत राजकारणामुळे चर्चेत होत्या. मात्र, आता त्यांच्या मंत्रिमंडळातील सहभागाने पक्षात त्यांच्या स्थानाला अधिक बळकटी मिळणार असल्याचे मानले जात आहे.राजकीय विश्लेषकांच्या मते, पंकजा मुंडे यांना मंत्रिपद देऊन भाजपने मराठवाडा आणि ओबीसी समाजातील आपले स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने भाजपसाठी हा एक महत्त्वाचा निर्णय ठरू शकतो.मंत्रिमंडळ विस्ताराची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पंकजा मुंडे यांना कोणते खाते मिळणार स्पष्ट होणार असून याबाबत उत्सुकता वाढली आहे.