पोलिसांच्या मारहाणीमुळेच सूर्यवंशीचा मृत्यू !
शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण समोर आल्याने भीमसैनिकात संताप.

परभणी येथे डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधान प्रतिकृतीची तोडफोड करण्यात आल्याची माहिती मिळतात भीमसैनिकानी रस्त्यावर उतरून आंदोलक केले होते. या दरम्यान पोलिसांनी आंदोलन कर्त्यावर लाठीचार करत अमानुषपणे मारहाण करून काही आंदोलन करणाऱ्या ताब्यात घेतले होते. त्यात सोमनाथ सूर्यवंशी ला पोलिसांनी जबर मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.असे शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे.पोलिसांच्या मारहाणीमुळेच सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या संपूर्ण शरीरावर मारहाणीच्या खुणा स्पष्टपणे दिसत असल्याचे अहवालात म्हटले आहे.या आंदोलन दरम्यान अनेक निरपराध तरुणांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली. यामध्ये सूर्यवंशी यांचा समावेश होता.त्यांचा रविवारी (दि.15) पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला.या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर परभणी शहरात दाखल झाले आहेत.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सूर्यवंशी यांचा पोस्टमार्टम ऑन कॅमेरा करावा अशी मागणी केली होती. तसेच सूर्यवंशी यांना आम्ही न्याय मिळवून देऊ. त्यांच्या न्यायासाठी लढा देणार असल्याचेही ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे. पोलिसाच्या मारहाणीत मृत्यू झाल्याने आज महाराष्ट्रााची बंद देण्यात अली होती.त्यात पोलिसांच्या मारहाणीतच सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवाल समोर आल्याने भीमसैनििकांत संताप व्यक्त होत आहे.