सरपंच देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा करणार..पप्पू कागदे
पोलीस यंत्रणा दबावाखाली काम करत असल्याने हत्यारे फरार.

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील आरोपी जोपर्यंत अटक होत नाहीत. तोपर्यंत त्यांना कठोर शासन होणार नाही. तोपर्यंत रिपाई पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.पोलीस तपास करणारी यंत्रणा कोणाच्या तरी दबावाखाली काम करीत असल्याने आरोपींना अटक करण्यात अपयशी ठरली आहे असा आरोप युवा रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी केला. देशमुख कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत रिपाइं त्यांच्या पाठीशी उभे राहून पाठपुरावा करणार असल्याची माहिती कागदे यांनी दिली.सोमवारी युवा रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी मस्साजोग येथे देशमुख कुटुंबियांचे भेट घेवून सांत्वन केले. यावेळी कागदे म्हणाले की, हे हत्याकांड मानवतेला काळीमा फासणारे, अमानवीय व निर्दयीपणाची परिसीमा ओलांडणारी निंदनीय घटना आहे. जोपर्यंत या मारेकऱ्यांना अटक होत नाही, देशमुख कुटुंबियांना न्याय मिळत नाही. तोपर्यंत रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली पाठपुरावा करणार आहोत. कर्तव्य कठोर आयपीएस अधिकाऱ्यांच्या एसआयटी मार्फत या घटनेचा तपास करण्यात यावा. अशी मागणी यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी भेटून निवेदनाद्वारे केल्याचे ही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा सचिव राजू जोगदंड, तालुकाध्यक्ष दिपक कांबळे, माजलगावचे तालुकाध्यक्ष अविनाश जावळे, मराठवाडा संघटक गोवर्धन वाघमारे, जिल्हा संघटक रवींद्र जोगदंड, जिल्हा सल्लागार उत्तम मस्के, जिल्हा उपाध्यक्ष राहुल सरवदे, युवा रिपाइंचे निलेश ढोबळे, ईश्वर सोनवणे, राजेश सोनवणे, नाना गायकवाड, रंजित कांबळे, राहुल वाघमारे, सन्नी प्रधान यांच्यासह रिपाइंचे नेते उपस्थित होते.