देशमुख,सूर्यवंशी हत्या प्रकरणी एसआयटी चौकशी करा…पप्पु कागदे.
बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील पाहिजे निदर्शने.

परभणी येथील संविधानाच्या प्रतिकृती विटंबना प्रकरणी आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या पोलिसांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत यासाठी आज रिपाई चे युवा प्रदेश अध्यक्ष पप्पूजी कागदे यांच्या नेतृत्वाखाली बीड च्या जिल्हाधिकारी कार्यालया वर रिपाई चे तीव्र आंदोलन करण्यात आले*
परभणी येथील संविधानाच्या प्रतिकृती ची विटंबना झाली म्हणून लोकशाही मार्गाने न्यायिक लढा उभारणारा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या मृत्यूस(खून चं)कारणीभूत पोलीस निरीक्षक अशोक घोरबाड सह इतर पोलीस अधिकारी यांच्या वर कलम 32अन्वये ऍट्रॉसिटी कायद्यान्वये कलम 3(1)आणि 3(2)प्रमाणे गुन्हे दाखल करावेत,परभणी शहरातील सर्व पोलीस स्टेशन मधील तातडीने सिसिटीव्ही जप्त करून ते तपासावेत,शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुंटुंबाला पन्नास लाखाची आर्थिक मदत करावी अश्या विविध मागण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने रिपाई चे युवा प्रदेश अध्यक्ष पप्पूजी कागदे यांच्या नेतृत्वाखाली बीड च्या जिल्हाधिकारी कार्यालया वर तीव्र निदर्शने करण्यात आले.निवेदनावर पप्पु कागदे, मझर खान, राजु जोगदंड, किसन तांगडे, मायाताई मिसळे, रेश्माताई जोगदंड,महेश आठवले, अविनाश जोगदंड, बापु पवार, प्रभाकर चांदणष, भैय्यासाहेब मस्के, सुभाष तांगडे, मनोज बोराडे, विलास जोगदंड, अक्षय कोकाटे, नागेश दुबळे, भैय्या साळवे, संभाजी गायकवाड, शेख भाभी, नवनाथ डोळस, भास्कर जावळे, पप्पु वाघमारे, कालिदास ओव्हाळ, आप्पा मिसळे, महेंद्र वडमारे, खन्ना गायकवाड, भिमराव घोडेराव, शहाजी सोनवणे, आप्पा शेळके, अनिल शेंडगे, अशोक डोळसे, अरूण सोनवणे, , सोनू वडमारे, सुशिल जावळे, बाबु जाधव, संतोष सोनवणे आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.