ताज्या घडामोडी
ट्रकने स्कुटीला धडक दिल्याने एक जागीच ठार एक गंभीर जखमी !
अपघाताचा भयानक व्हिडिओ समोर

https://youtube.com/shorts/8u6mRTBGG0Y?si=eNyXFicGlHfoJgzF
बीड : गेवराई जवळ बायपास रस्त्यावर सायंकाळच्या सुमारास स्कुटीवरून बीडच्या दिशेने येणाऱ्या दोघांना उडविले. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे.गेवराई येथील बायपासजवळ स्कुटीवरून बीडच्या दिशेने येत असलेल्या दोन ट्रक एकमेकांना ओव्हरटेक करत असताना ट्रकने स्कुटी जोराची धडक दिली त्यामुळे स्कुटीवरील चालकाला तोल सांभाळता न आल्याने पाठीमागील चाकाखाली स्कुटी आली. यामध्ये पाठीमागे बसलेल्या बाजूला पडला. तर गाडी चालविणाऱ्याच्या डोक्यावर टायर गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. रस्त्यावर मांसाचा सडा पडला होता. उपस्थित लोकांनी जखमीला रुग्णालयात घेऊन गेल्याचे समजते. यातील दोघांचीही नावे समजले नसून म्रताची ओळख पटविण्याचे काम पोलीस करत आहेत.