ताज्या घडामोडी
सरपंच खून प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे पोलिसांच्या ताब्यात !.
बीड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

केज मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी दिवसा अपहरण,हत्येबरोबरच खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी विष्णू चाटे हा संभाजी नगर कडून बीड कडे येत असण्याची गोपनीय माहिती बीड स्थानिक गुन्हे शाखेला मिळाले असता.पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या मार्गदर्शनाखाली बीड स्थानी गुन्हे शाखेची टीमने जालना रोडवरील महालक्ष्मी चौका जवळ ताब्यात घेतले बीड जिल्ह्यासह राज्यात गाजत असलेल्या सरपंच संतोष देशमुख यांचे दिवसाढवळ्या अपहरण करून हत्या करण्यात आल्याने सहा आरोपीच्या विरोधात केज पोलीस अपहरण व हत्या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. हत्या प्रकरणी बीड स्थानिक गुन्हे शाखेने तीन आरोपी गजाआड केले होते.आज चौथा संशयित आरोपी विष्णू चाटेला जालना रोडवरील महालक्ष्मी चौक येथून ताब्यात घेतली असून.इतर आरोपीचा बीड पोलीस शोध घेत आहे.