बार्शी रोडवर नालीचे पाणी रस्त्यावर,विद्यार्थ्यांसह नागरीकांचे आरोग्य धोक्यात.
शाळेसमोरच वाहते गटारगंगा...न.प.चे दुर्लक्ष.

बीड शहरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बार्शी नाका या दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजुने नाली नसल्याने हॉटेल,शाळा,लग्न कार्यालयाचे सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने ये जा करणाऱ्यांना याचा नाहक त्रास होत असून दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. बार्शी नाक्या जवळील एका शाळेजवळील नालीचे पाणी अक्षरशः रस्त्यावरून वाहत असल्याने या परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झाले. नालीचे पाणी रस्त्यावर आल्याने शाळेभोवती घाणीचे साम्राज्य पसरले आहे.या घाणीमुळे शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांचे आरोग्य धोक्यात तर आलेच पण येणाऱ्या जाणाऱ्या नागरीकांसह विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर नालीचे पाणी येत असल्याने दुचाकीस्वार घासरून अपघात देखील होत आहेत.नालीचे पाणी रस्त्यावरून वाहत असतांनाही महामार्ग विभागासह नगरपालिका प्रशासन याकडे साफ दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.महामार्गाच्या दोन्ही बाजूने काही ठिकाणी नालीचे काम करण्यात आले तर काही ठिकाणी नालीचे काम झालेले नाही. बार्शी नाका पुल ते बार्शी नाका या दरम्यान नाली नसल्याने आजु बाजुचे पाणी रस्त्यावरून वाहू लागले. या दुषीत पाण्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले. या धाणीमुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले. या परिसरामध्ये एक इंग्लिश स्कुल आहे.या शाळेत जाता येतांना विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना त्रास सहन करावा लागतो. विद्यार्थ्यांना या गटारातूनच रस्ता शोधावा लागतो.रस्त्याच्या दोन्ही बाजुला नाल्या करण्याचे काम महामार्ग विभागाचे आहे. नगर पालिकाही या प्रकरणाला तेवढीच दोषी असुन न.प. ने शहरातील घाण वेळीच दुरूस्त करायला हवी त्याबाबत ठोस भुमिका घ्यायला हवी.याकडे महामार्ग विभाग दुर्लक्ष करत आहे तसेच बीड नगर पालिकेकडून दुर्लक्ष होवू लागल्याने नागरीकात संताप व्यक्त केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बार्शी नाका या रस्त्याच्या दोन्ही बाजूस नाली नसल्याने पावसाळ्यात तर रस्त्यावरच तलावाचे स्वरूप येते. त्यामुळे रस्त्यावर पाणी का पाण्यात रस्ता हेच प्रवाशांना व ये जा करणाऱ्यांना समजत नाही त्यामुळे रस्त्या च्या दोन्ही बाजूस नाली करून द्यावी अशी मागणी नागरिकातन होत आहे.