गोळीबार प्रकरणी मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात !.
बीड स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी,डोंगरे कुटुंबावर घरात घुसून गोळीबार केला होता.

बीड-पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळीबार करून फरार झालेले कुख्यात आरोपीना आठवले गॅंग अखेर स्थानिक गुन्हे शाखेने पुण्यात पाठलाग करून पकडले आहे.सनी आठवले,अक्षय आठवले वर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून ते फरार होते.काल रात्री उशिरा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय मुरकुटे, मुन्ना वाघ यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी ही मोठी कारवाई केली आहे. आज या आरोपीना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती आहे.अक्षय आठवले, मनीष क्षीरसागर, ओंकार सवाई असे अटक केलेल्या आरोपीचे नावे आहेत. ओंकारला बीडमधून तर अक्षय आठवले आणि मनीष क्षीरसागरला पुण्यातून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. बीड जिल्ह्यात मनीष क्षीरसागर हा बनावट नोटा प्रकरणी मुख्य आरोपी असून तो काही महिन्यापासून फरार होता. अक्षय आठवलेवर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते. पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीतील घटनेत तर आरोपीनी डोंगरे कुटुंबीयावर रात्री दोन वाजता घरात जावून गोळ्यांचा पाऊसच पाडला होता. या गोळीबारामध्ये विश्वास डोंगरे याना दोन गोळ्या लागल्याने ते गंभीर जखमी असून त्यांच्यावर संभाजीनगर येथे उपचार सुरू आहेत. अखेर स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून आरोपीला पुण्यातून अटक केली.