माजी सरपंचांने हडपली मंदिराची जमीन,गून्हा दाखल.
बनावट कागदपत्रे तयार करून हडपली होती जमीन.

नेकनुर:- ( दि.१९) बीड तालुक्यातील नेकनुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोलंग्री येथील हनुमान देवस्थानची गट नंबर २५१ मधील ०९ हेक्टर ०८ आर जमिन बनावट कागदपत्रे व बनावट पीटीआर तयार करून माजी सरपंच पती तात्यासाहेब कवडे यांनी हडप करण्यात आल्याची लेखी तक्रार गोलंग्रीचे विद्यमान उपसरपंच श्रीकांत कवडे यांनी पुराव्यानिशी दिल्यानंतर अखेर खोटे दस्तऐवज तयार करून देवस्थानची ईनामी जमीन हडपल्याप्रकरणी माजी सरपंच पतीसह गावातील ७ जणांवर नेकनुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असुन गुन्ह्याचा तपास सपोनि चंद्रकांत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नारायण खटाणे करत आहेत.
सदरील इनामी जमिनीचे फेरबदल २०१२ ते २०१७ या कार्यकाळात तत्कालीन सरपंच मनिषा तात्यासाहेब कवडे यांच्या कालावधीत सरपंच पती तात्यासाहेब कवडे यांनी खोटे दस्तऐवज प्रशासनाला सादर करत दिशाभूल करून हनुमान देवस्थानची जमिनीची नोंद उडवुन त्याजागी मारोती मंदिराची जमीन अशी नोंद करण्यात आली.व त्याच जमिनीचा ७/१२ व पीटीआर साम्य करून मारोती मंदिर या नावाने तयार करण्यात आला. विद्यमान उपसरपंच श्रीकांत कवडे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी कागदोपत्री पुराव्यानिशी नेकनुर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिल्यानंतर अखेर १) तात्यासाहेब कवडे २)पोपट कवडे ३) संतोष कवडे ४) प्रविण मते ५)शहादेव कवडे ६)सुदाम हिंदोळे ७)कलावती कवडे या सात जणांविरुद्ध दि.१६ डिसेंबर रोजी एफआयआर क्रमांक ०३७६ /२०२४ दाखल झाला असुन भारतीय दंड संहिता १८६० नुसार कलम ४२० , ४६५ ,४६६,४७१,३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्तिक वारीसाठीचा मदतनिधी हडपला.
पुर्वीपासून गोलंग्री ग्रामस्थ हनुमान देवस्थान जमिनीचा ११ महिन्यांसाठी जाहीर लिलाव करायचे.त्या लिलावातुन आलेली रक्कम पंढरपूरला कार्तिकी वारीसाठी गावातुन जाणाऱ्या लोकांना सहकार्य केले जात असे.परंतु २०१७ मध्ये तत्कालीन सरपंच पती तात्यासाहेब कवडे यांनी बनावट दस्तऐवज तयार करत मारोती मंदिर संस्थानच्या नावाने जमीन हस्तांतरित केल्यानंतर जुन्या सर्व गोष्टी बंद करून या ७ लोकांनीच ०९ हेक्टर ०८ आर जमीन ताब्यात घेऊन खात आहेत. त्याचा मोबदला गावाला किंवा पंढरपूरच्या कार्तिकी वारीसाठी दिला जात नाही.त्यामुळे २०१७ पुर्वीप्रमाणेच ही जमीन गावकऱ्यांच्या स्वाधीन करण्याची मागणी गोलंग्रीचे उपसरपंच श्रीकांत कवडे यांनी ग्रामसभेचे ठराव घेऊन केली आहे.
बोगस पिक विमा भरून शासनाची फसवणूक ७ वर्षांपासून रक्कम लाटली.
माजी सरपंच पती तात्यासाहेब कवडे यांनी २०१७ मध्ये हनुमान देवस्थान जमिनीचे मारोती मंदिर नावाने बनावट कागदपत्रे तयार करून २०१७ पासुन आजतागायत खरीप आणि रब्बी दोन्ही पिकांचा विमा भरून उचलला असुन शासनाची आर्थिक फसवणूक केली आहे.विशेष म्हणजे सदरील जमीन शासन निगराणीत असुन तसा निकाल उपविभागीय अधिकारी बीड यांनी दिलेला आहे. तरीही इनाम देवस्थान जमिनीवर संस्थेच्या नावाने नव्हे तर स्वतःचे नाव लाऊन ७ वर्ष पिक विम्याची रक्कम लाटली आहे.