क्रूरता ! सरपंच देशमुख यांच्या शरीरावर 150 वार 56 जखमा.
देशमुखची हत्या करणाऱ्यांना व मास्टर माईंडला अटक करून फाशी देण्याची लोकसभा,विधानसभेत मागणी.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे ९ डिसेंबर रोजी दिवसाढवळ्या अपहरण करून हत्या करण्यात आली होती. देशमुख यांच्या शरीरावर १५० वार केल्याचे व्रण आणि ५६ जखमा असल्याचे शवविच्छेदनाच्या अंतिम अहवालातून समोर आले. त्यामुळे देशमुख यांना किती क्रूरतेने मारण्यात आले हे स्पष्ट झाले.यांचे पडसाद हिवाळी अधिवेशनात तसेच लोकसभेत पडले. बीड जिल्ह्यातील सर्वच आमदारांनी या घटनेचा निषेध करून आरोपींना व त्या मागील मास्टर माईंडला तात्काळ अटक करावी अशी मागणी केली. देशमुख यांच्या शरीरावर एकही जागा अशी नव्हती की जिथे मारहाण व जखमा नव्हत्या त्यामुळे मानवी कृत्याला लाजवेल अश्या प्रकारे मारहाण व हत्या करण्यात आली. मृतदेहाची उत्तरनीय तपासणी चां ८ पानी अंतिम अहवाल जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्यामार्फत सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. देशमुख यांच्या फुफ्फुसालाही इजा, चेहऱ्यावर वार अहवालानुसार मृत देशमुख यांना रॉडसारख्या शस्त्राने अमानुषपणे मारहाण करण्यात आली होती. पाठीसह छाती, हात, पाय आणि चेहऱ्यावरदेखील वार करण्यात आले. तसेच त्यांच्या फुफ्फुसाला इजा झाल्याने, मारहाण केल्यानेच देशमुख यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले असून देशमुख यांच्या मारेकऱ्यांना व त्या मागील मास्टरमाइंडला तात्काळ अटक करून फाशी देण्यात यावे अशी मागणी लोकसभा,विधानसभेत व बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातून होत आहे.