सरपंच खून प्रकरणात पोलीस अधीक्षक यांची उचलबांगडी !
वाल्मीक कराडवर मोक्का लागू करणार.. मुख्यमंत्री फडणवीस.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आणि खंडणी प्रकरणात गुन्हेगार वाल्मिक कराडवर कठोर कारवाई केली जाईल, अशी स्पष्ट घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या प्रकरणातील दोषींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.मुख्यमंत्री फडणवीस हे नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या अल्पकालीन चर्चेत बोलत होते. त्यांनी मस्साजोग प्रकरणावरून कठोर भूमिका घेत, सरकारचा कायदा व सुव्यवस्थेवर ठाम विश्वास असल्याचे अधोरेखित केले.एसपी अविनाश बारगळ यांची तडकाफडकी बदलीमस्साजोग प्रकरणाशी संबंधित तपासात झालेल्या त्रुटींवर नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक (एसपी) अविनाश बारगळ यांची तात्काळ बदली करण्याची घोषणा केली. तपासाच्या प्रक्रियेत योग्यतो बदल घडवून आणण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.सरकारची ठाम भूमिका सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, सरकारने दोषींविरुद्ध कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. मोक्का अंतर्गत कारवाईमुळे गुन्हेगारांवर कठोर शिक्षा होईल, असे फडणवीस म्हणाले.राज्य सरकारने अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम उघडण्याचा इशारा दिला आहे.