
परळी नगरपालिकेत प्रधानमंत्री आवास योजना विभागात काम करणार्या कर्मचार्यास मंत्री धनंजय मुंडे समर्थक माजी नगरसेवक व एका माजी नगरसेवकाच्या पुत्राने मारहाण केल्याची घटना आज घडली आहे.
दरम्यान वाल्मीक कराड यांच्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल सुरू आहे, यातच आता धनंजय मुंडे यांच्या समर्थक माजी नगरसेवकाने कर्मचाऱ्याला मारहाण केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
नेमके काय घडले?
परळी नगरपालिका कार्यालयात प्रधानमंत्री आवास योजना विभागात गायकवाड नावाचे कर्मचारी शुक्रवार दि.20 डिसेंबर रोजी सकाळी कार्यालयात आल्यानंतर धनंजय मुंडे समर्थक माजी नगरसेवक अन्वर मिस्किन व एका माजी नगरसेवकाच्या पुत्राने घरकुलाच्या कारणावरून त्या कर्मचाऱ्यास शिवीगाळ करत मारहाण केली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून कर्मचार्यास मारहाण झाल्यानंतर नगरपालिका कार्यालयातील सर्व कर्मचार्यांनी कामबंद आंदोलन केले. याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात यावा कर्मचार्यांनी कामबंद आंदोलन केले. याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी न.प. कर्मचाऱ्यांनी परळी शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.धनंजय मुंडेंच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता, समर्थक माजी नगरसेवकाकडून न.प. कर्मचाऱ्यास मारहाण परळी नगरपालिकेत प्रधानमंत्री आवास योजना विभागात काम करणार्या कर्मचार्यास मंत्री धनंजय मुंडे समर्थक माजी नगरसेवक व एका माजी नगरसेवकाच्या पुत्राने मारहाण केल्याची घटना आज घडली आहे.दरम्यान वाल्मीक कराड यांच्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल सुरू आहे, यातच आता धनंजय मुंडे यांच्या समर्थक माजी नगरसेवकाने कर्मचाऱ्याला मारहाण केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.