
बीड पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तडकाफडकी बदली केली.मस्साजोग चे सरपंच देशमुख सरपंच संतोष देशमुख यांचे दिवसाढवळे अपहरण करून हत्या करण्यात आली होती.मागील एक महिन्यात हा तिसरा खून असून खंडणी,चोऱ्या,मारामाऱ्या, गोळीबार व अपहरणचे प्रमाणत वाढ झाली होती.सरपंच देशमुख यांची हत्या झाल्याने हे प्रकरण लोकसभा, विधानसभेत गाजले होते.या हत्येतील आरोपी अद्यापही फरार असून त्यांना अटक करण्यात बीड पोलीस अपयशी ठरले आहेत.त्यामुळे पोलिसांच्या कार्य पद्धतीवर प्रश्न चिन्ह उपस्थित झाले होते.बीड पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची गुन्हेगारांवर वचक नसल्याचे स्पष्ट झाले होते.यांची बदली करून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी व या हत्या मागील मास्टर माईंड ला तत्काळ अटक करावी अशी मागणी आमदार सुरेश धस,संदीप शिरसागर यांनी लावून धरली होती .याची दखल घेत अविनाश बारगळ यांची तडकाफडकी बडली केल्याची घोषणा अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.अविनाश बारगळ यांच्या जागी आता सिंधुदुर्ग येथून बीड पोलीस अधीक्षक दिक्षित गेडाम यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.