वाल्मीक कराडच देशमुख हत्येचा मास्टर माईंड…आ.संदीप क्षीरसागर
तेरा दिवस उलटले तरी हत्येतील आरोपी फरार कसे?

केज तालुक्यातील मस्साजोग मधील सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी पवनचक्कीच्या वादातून दिवसाढवळ्या अपहरण करून निघृण हत्या करण्यात आली होती. या हत्येमुळे बीड जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली. या घटनेनंतर आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी देशमुख कुटुंबाची भेट घेतली. यावेळी शरद पवारांनी या घटनेच्या खोलात गेले पाहिजे. या घटनेमागचा सूत्रधार कोण, हे तात्काळ शोधून काढलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली. ते मस्साजोगमध्ये बोलत होते. शरद पवारांनी मस्साजोग मध्ये जाताच सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी शरद पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळाला पाहिजे, दुखात आपण सर्व सोबत आहोत. राज्य सरकार आणि केंद्र सरकार याच्या खोलात जाईपर्यंत जात नाही तो पर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे शरद पवार म्हणाले.
संतोष देशमुख यांच्या हत्येला आज १३ दिवस झाले पण आज मुख्य आरोपी अटक होत नाही. त्यांच्या मुलीची काय भावना आहे. की ७ आरोपींना पकडाल पण त्यांचा जो म्होरक्या आहे. त्यांना कधी पकडाल नाही तर तो अजून ७ आरोपी तयार करेल अशी भीती त्यांच्या लहान मुलीला वाटत आहे. या कुटुंबीयांना सरंक्षण देण्याची मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे. आमच्या तालुका जिल्ह्यात मोठी दहशत आहे. अनेकांचे नाव सभागृहात घेतले जात आहे. असे खासदार बजरंग सोनवणे यांनी सांगितले.
आज शरद पवार हे देशमुख कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी मसाजोग येथे आले असता यांच्यासमोर या हत्या मागील मास्टरमाइंड “वाल्मिक कराड” यांचं नाव घेतलं. तेव्हा, सगळे स्तब्ध होऊन क्षीरसागर यांच्याकडे पाहतच राहिले. संदीप क्षीरसागर म्हणाले, मास्टमाइंड हा फक्त वाल्मिक कराड आहे. वाल्मिक कराडनं बीड जिल्हा नासवण्याचं काम केलं आहे. याच्यामुळेच दोन समाजात तेढ निर्माण झाले आहेत. आपल्याला रडून चालणार नाही. घाबरण्याची आणि कुणाला भिण्याची गरज नाही. न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यास उशीर लावला. तसेच, अटकही झाली नाही. नाव घेण्यास सुद्धा लोक कचरत आहे. दोन समाजात भांडणे लावण्याचं काम, हा माणूस करत आहे. असं म्हणत क्षीरसागर यांनी कराडवर हल्लाबोल केला आहे.