ताज्या घडामोडी
पंकजा मुंडेना पर्यावरण तर धनंजय मुंडे अन्न व नागरी पुरवठा मंत्री !
अधिवेशन संपताच खातेवाटप जाहीर.

राज्यातील मंडळाचे खातेवाटप अखेर जाहीर झाले असून गृहखाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवले आहे. एकनाथ शिंदेंना नगरविकास तर अजीत पवारांकडे अर्थमंत्रालय कायम असून बीड जिल्ह्यातून धनंजय मुंडेंना अन्न व नागरी पुरवठा तर पंकजा मुंडेंकडे पर्यावरण, वातावरण बदल आणि पशू संवर्धन ही खाती देण्यात आली आहेत.मागच्या रविवारी राज्यमंत्री मंडळाचा विस्तार झाला होता तेव्हापासून खातेवाटप रखडले होते.आज विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खातेवाटप जाहीर केले आहे.भाजपने गृह, ऊर्जा आदी महत्त्वाची खाती स्वतःकडे ठेवली आहेत.बीड जिल्ह्याच्या वाट्याला धनंजय मुंडेंच्या माध्यमातून अन्न व नागरी पुरवठा हे खाते आले आहे तर पंकजा मुंडे पर्यावरण आणि पशू संवर्धन ही खाती सांभाळणार आहेत.