सरपंच खून प्रकरणी विशेष वकील म्हणून बाळासाहेब कोल्हे यांची नियुक्ती !

मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची दिवसाढवळ्या अपहरण व हत्या करण्यात आली होती. यामुळे बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी व मास्टरमाइंड यांना अटक करण्यात यावी अशी मागणी लोकसभा,विधानसभेत केली होती. तसेच या हत्येचा तपास विशेष पोलीस महानिरीक्षक पदाच्या अधिकाऱ्यालाच देण्यात यावा अशी देखील मागणी आ.सुरेश धस यांनी केली होती. तसेच या हत्या प्रकरणी विशेष वकीलाची नेमणूक करण्यात यावी अशी देखील मागणी होती, त्यामुळे दिनांक २१ डिसेंबर रोजी ‘विशेष लोक अभीयोजक” म्हणून बाळासाहेब दत्तात्रय कोल्हे यांची विशेष वकील म्हणून नेमणूक करण्यात आली.तसेच विशेष वकील म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या बाळासाहेब कोल्ह यांची फी गृह विभाग करणार आहे. बाळासाहेब कोल्हे याना फौजदारी प्रकरणातील अनुभव,माहिती व अभ्यास असल्याने त्यांनी बऱ्याच आरोपींना शिक्षेस पात्र होईल असे प्रकरणे निकाली लावले त्यामुळे त्यांना विशेष जबाबदारी म्हणून नियुक्त करण्यात आले.असा आदेश अनुभाग अधिकारी,विधी एव न्यायपालिका विभाग प्रमुख वैशाली बोरुडे यांनी काढला आहे.