परळीत अपगांस शिवभोजन चालकाकडून अमानुष मारहाण !
जिल्ह्यातील बोगस शिवभोजनचा परवाना रद्द करावा,प्रहार संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करणार.. दिपक पवार

बीड (प्रतिनिधी) महाराष्ट्र सरकारने गोरगरीब, बोल मजुरी करणाऱ्या नागरिकास अल्पदरात जेवण देण्यासाठी शिवभोजन देण्यात येते.परंतु यात गोरगरिबाच्या नावावर पैसे उकळण्याचे काम काही शिवभोजन चालक करत आहेत, जेवणाचे एकच ताट ठेवून त्याचे फक्त फोटो काढत शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारत आहे. बीड जिल्ह्यातील परळी शहर हे पुन्हा वादग्रस्त ठरत आहे.परळी येथील एक दिव्यांगास रेल्वे स्टेशन येथील शिवभोजन चालवणाऱ्या मालकाने जेवण मागितल्याने अमानुष मारहान केली आहे. असा धक्कादायक प्रकार परळी तालुक्यात घडला आहे. दिव्यांग व्यक्तीला मारहाण करत असताना त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या व्यक्तीने हा मारहाणीचा प्रकार पाहून मध्यस्थी केली. सदरील शिवभोजन चालवणाऱ्या मालकाला कळायला पाहिजे होते की, दिव्यांग व्यक्तीने असा कोणता गुन्हा केला होता. जेवणासाठी आलेल्या दिव्यांगला खाली पाडून छातीत लाथा, बुक्क्या मारतानाचा व्हिडिओ सोशल मीडयावर बाहेर झाला त्यामुळे त्या शिवभजन चालकावर संताप व्यक्त होत आहे.जर त्या कडून काही चुक झाली असती तर त्याला पोलिसांना येई पर्यंत पकडून पोलिसांच्या स्वाधीन करायला हवे होते. खाली पडून त्याच्या छातीत लाथा मारणे हे त्या शिवभोजनच्या मालका कडून दिव्यांगास अमानुष मारहान झाली तेव्हा पासून सदरील दिव्यांग कोणालाही सापडत नाही. त्याला ही पोलिसांनी शोधून काढावे. त्याचे काही बरे वाईट होऊ नये. पोलीस अधीक्षक साहेब यांनी संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांचे मार्फत दिव्यांग अधिनियम 2016(92)1नुसार शिवभोजनच्या मालका विरोधात गुन्हा नोंदवून त्यांना अटक करावी तसेच जिल्हाधिकारी साहेबांनी त्या शिवभोजनन चां परवाना रद्द करावा.तसेच जिल्ह्यातील सर्वच शिव भोजन ची तपासणी करून बोगस शिव भोजनवर कारवाई करावी अशी मागणी प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष दीपक पवार यांनी केली आहे.