पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनच्या अडचणीत वाढ !
सरपंच खून प्रकरणी खासदाराचे फोन न उचलणे पडले महागात.

बीड पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचे फोन उचलणे चांगलेच महागात पडले असून राज्याच्या मुख्य सचिवांनी हक्कभंगाचा प्रस्ताव दिला आहे. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे दिवसाढवळ्या अपहरण करून निर्घृण खून करण्यात आला होता. या घटनेने बीड जिल्हाया सह महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. बीड पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी हत्येच्या तपासात दिरंगाई केल्याने त्यांची तडकाफडकी बादली करण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. सरपंच हत्येतील आरोपींना तात्काळ अटक करावे म्हणून खासदार बजरंग सोनवणे यांनी बीड पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांना अनेक वेळा फोन केले, त्यांच्या पीए च्या मोबाईल नंबर देखील फोन लावण्यात आले परंतु खासदारांचे फोन बारगळ यांनी फोन न उचलने चांगलीच अंगलट आले. त्यांच्यावर राज्याच्यां मुख्य सचिवाकडे हक्क भंगाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला. त्यावर राज्याच्या मुख्य सचिवांनी अविनाश बारगळ यांच्यावर हक्क भंग प्रस्ताव दाखल झाल्याने पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या अडचणी नक्कीच वाढ झाली आहे.