पुन्हा बिबट्या दिसला !
शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण,वनविभागाचे अधिकारी बिबट्याच्या शोधात.

बीड. बीड जिल्ह्यामध्ये मागील काही महिन्यापूर्वी मांजरसुंबा घाटात रात्रीच्या वेळी बिबट्या दिसला होता. त्यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण पसरले होते. पुन्हा रात्रीच्या वेळेस बीड तालुक्यातील च-हाटा या गावातील परिसरात दक्षिण बाजूस एका शेतातील पाझर तलावाजवळ काल दि. २२ रविवार रोजी सायंकाळी साडेसात ते पावणे आठच्या सुमारास या सुमारास विवठ्याचा वावर दिसून आला. असल्याने असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले याची माहिती मिळताच वीड तालुका वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी चहाटा गावाकडे रवाना झाल्याची माहिती मिळाली आहे.च-हाटा परिसरातील दक्षिण वाजूस धुमाळवाडी, जाधव वाडी, कदमवाडी, पिंपळवाडी ही गावी आहेत एडवोकेट अजय तांदळे यांच्या १३० सर्वे नंवर मधील शेता जवळील पाझर तलावा जवळ फिरत असताना वाजूनेच रस्त्याने दिनकर धुमाळ हे जात होते त्यांना तो विवठ्या दिसला शेतकरी याची माहिती तात्काळ वन विभागाला दिली असता वनविभागाचे कर्मचारी,अधिकारी तात्काळ च-हाटा गावाकडे रवाना झाले . बिवट्या दिसल्याने परिसरातील जाधव वाडी, धुमाळवाडी, पिंपळवाडी, कदमवाडी, राजुरी वंजारवाडी, उकंडा, शिरापूर धुमाळ, या भागातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.आता हा बिबट्या रात्रीत कोणत्या दिशेने जातो याकडे शेतकऱ्याचे लक्ष लागले आहे.