
केस तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे दिवसाढवळ्या अपहरण करून हत्या करण्यात आली होती.या हत्येमागील मास्टर माईंड वाल्मीक कराड असल्याचे उघडपणे लोक बोलू लागले आहेत. वाल्मीक कराडवर परळीत 23 गुन्ह्यांचा आरोप अंजली दमानिया मुख्यमंत्र्यांकडे जाब विचारणार संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. याप्रकरणावरून आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.त्यांनी आरोप केला आहे की, वाल्मीक कराडवर परळीत 23 गुन्हे दाखल असूनही तो मोकाट फिरत आहे. यावरून त्यांनी सरकारवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कराडवर दाखल गुन्ह्यांची यादी सादर करणार आणि त्याबाबत जाब विचारणार असल्याचे दमानिया यांनी सांगितले आहे.संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून विरोधक सरकारवर आक्रमक झाले असून हे प्रकरण विधानसभेत आणि संसदेतही गाजले आहे. वाल्मीक कराड, ज्याला धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय मानले जाते, त्याचे नाव मुख्य आरोपी म्हणून पुढे येत आहे.दमानिया यांनी माध्यमांशी बोलताना, “गुन्हे दाखल असूनही कारवाई होत नाही, यावरून सरकारची भूमिका संशयास्पद वाटते. या संदर्भात आम्ही मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरू,” असे ठामपणे सांगितले आहे.या घटनेमुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणाने आणखी राजकीय व सामाजिक वाद निर्माण केला असून याबाबत पुढे काय पावले उचलली जातील, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.