
पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीत मागील काही महिन्यापासून अवैध धंदे बोकाळले आहेत.या हद्दीतील सर्वच धाब्यावर तसेच गावागावात अवैध दारू विक्री खुलेआम होताना दिसते. पिंपळनेर पोलीस ठाण्यपासून हाकेच्या अंतरावर तसेच घाटसावळी ढेकनमोहा येथे हॉटेलमध्ये, टपरीवर बिनधास्त मटका घेतला जातो.तसेच या भागात चंदन चोरांनी देखील धुमाकूळ घातला आहे परंतु पोलिसांकडून एकही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याने अवैध धंद्यावाल्यांनी डोके वर काढले आहे. दिनांक २२ डिसेंबर रोजी रात्री आठ वाजता लिंबारूई येथील शेतात शेतकरी जगन्नाथ ज्ञानोबा नांदे वय ५७ वर्ष हे शेतराखण करण्यासाठी शेतात गेले असता त्यांना अज्ञातानी मारहाण करत मोटर सायकल जाळून टाकली. याची माहिती पिंपळे पोलीस ठाणे प्रमुखांना दिले असता पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. शेतात गहू, हरभरा, भुईमूग पिकासाठी पाणी देणे, वन्यप्राण्यांपासून बचाव करण्यासाठी पिकांची राखन करण्यासाठी शेतातच बाज टाकून शेतात बाजावर बसलेले असताना अचानक अज्ञात दोन,तीन व्यक्ती आले आणि काठी ने बेदम मारहाण करून प्राणघातक हल्ला चढवला आणी बेशुद्ध होई पर्यंत मारहाण करण्यात आली तसेच रस्त्यावर लावण्यात आलेली मोटार सायकल MH 13BW3293 मोटारसायकल जाळली असल्याची माहिती मारहाण झालेल्या शेतकरी नांदेयांचे बंधू भास्कर नांदे यांनी दिली आहे. सदरील घटना गंभीर असल्याने शेतकऱ्यांना शेतात बेदम मारहाण झाल्यामुळे शेतकऱ्यांत भितीचे वातावरण पसरले आहे मारहाण करणाऱ्यांना आरोपींना तात्काळ शोध घेऊन अटक करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. मारहाण करणार्या व दुचाकी जळणाऱ्या आरोपीचा शोध पिंपळनेर पोलीस ठाण्याचे कर्मचारी करत आहेत.