शिवसृष्टीने घेतला मोकळा श्वास !
खाद्यपदार्थाच्या गाड्यांमुळे शिवसृष्टी गेली होती पडद्याआड.

बीड शहरातील डॉ.आंबेडकर पुतळ्याच्या तसेच शहरातील सर्वच महापुरुषांच्या पुतळ्याच्या बाजूला असलेले अतिक्रमण काढून गाडे,हॉटेल, चायनीज, कॉफ सेंटरवर सर्रास घरगुती सिलेंडरचा वापर.
छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ऐतिहासीक गोष्टींना उजाळा देण्यासाठी शिवसृष्टीचे सौंदर्यकरण करण्यात आले. वेगवेगळे देखावे शहरातील नागरीकांना पाहता यावे व आपला इतिहास समजावा या उद्देशाने शिवसृष्टीचे निर्माण करण्यात आले होते. मात्र सद्या शिवसृष्टीला खाद्यपदार्थांच्या गाड्यांनी विळखा घातला आहे. सकाळी ६वाजल्यापासुन ते १२ वाजेपर्यंत येथे नागरीकांची सकाळच्या नाष्ट्यासाठी मोठी गर्दी होत असते. यामुळे पाठीमागे असणारी शिवसृष्टी पुर्णपणे झाकुन जाते. सुरुवातीला एक दोन असणारे वडा-सांबर चे गाडे आज १५ च्या आसपास झाल्याने येथे वाहतुकीची समस्याही उद्भवु लागली आहे. यातुन वाहन रस्त्यावरच पार्किंग केल्याने वाहतूक कोंडी देखील होत होती.याबाबीकडे नगरपालिका प्रशासन व शिवप्रेमींनी तात्काळ लक्ष देणे आवश्यक बनले होते, खाद्य पदार्थांच्या गाड्यांना ठरावीक जागा उपलब्ध करून देण्यात यावी व शिवसृष्टीला अतिक्रमणाच्या विळख्यातुन मुक्त करण्यात यावे. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील ऐतिहासीक शिवसृष्टी अतिक्रमण व खाद्य पदार्थांच्या गाड्यांमुळे विद्रुपीकरणाकडे जात आहे. न.प. शिवसृष्टीकडे डोळझाक करत असुन येथील साफसफाई होत नसुन परिसरातील लावलेल्या गाड्यांमुळे केरकबरा, पाणी यांचा निचारा होत नसल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. दररोज लावणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांमुळे नागरीकांची या ठिकाणी नाष्ट्यासाठी गर्दी होत असल्याने शिवसृष्टीचे सौंदर्य धोक्यात आले आहे. काही नागरीक तर अक्षरशः शिवसृष्टीच्या पायऱ्यावरच बसुन नाष्टा करतात व प्लेट त्याठिकाणी टाकुन देतात. इतिहासकालीन क्षणचित्रे असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भावमुद्रा याठिकाणी नागरीकांना मनमोहून टाकतात. मात्र खाद्यपदार्थाच्या अतिरीक्त गाड्यांमुळे शिवसृष्टीचे सौंदर्य धोक्यात व शिवसृष्टी अतिक्रमणाच्या विळख्यात आली असण्याने शिवप्रेमीनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिल्याने आज सकाळी १२ वाजण्याच्या सुमारास शहर पोलीस ठाणे अधिकारी,कर्मचाऱ्यानी खाद्यपदार्थाच्या गाड्याची तपासणी केली यामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा वापर होत असल्याचे दिसल्याने त्यांनी या गाड्यावरील घरगुती गॅस सिलेंडर, शेगड्या व इतर साहित्य जप्त करत खाद्यपदार्थ विकणाऱ्यांना शहर पोलीस ठाण्यात पुढील कारवाईसाठी नेण्यात आले. बीड शहरात छोट्या मोठ्या उद्योग, हातगाडे, पावभाजी सेंटर, कॉफी सेंटर तसेच मोठे हॉटेलवर सर्रास घरगुती सिलेंडरचा वापर होत आहे. त्याकडे संबंधित पोलीस ठाणे व पुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत असून मोठ्या हॉटेलवर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकातून होत आहे. घरगुती सिलेंडर वापर होत असल्याने हातगाड्या कारवाई करण्यात आली असून मोठ्या हॉटेलवर तपासावी करून कारवाई कधी?असा प्रश्न छोटे व्यवसाय व सर्वसामान्य पडला आहे.