त्या “आकाला” जेलमध्ये जावेच लागेल…आ.सुरेश धस
बीड जिल्ह्यात कायदा,सुव्यवस्था शिल्लकच राहिली नाही.

बीड जिल्ह्यात मागील काही वर्षापासून कायदा सुव्यवस्था शिल्लक राहिलेली नाही. बीड जिल्ह्यात खोटे गुन्हे दाखल करण्यात परळी एक नंबर आहे. परळीतील व्यापारी दहशतीखाली असून त्यांच्याकडून असलेल्या एजन्सी धमकावून काढून घेत आहेत. त्यामुळे अनेकांनी परळी सोडून पुणे मुंबई या ठिकाणी वास्तव्यास गले आहेत. बीड जिल्ह्यात गैंग ऑफ वासेपूर सुरू आहे. असा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केला. मी पोलीस ठाण्यात सर्वात कमी फोन करणारा नेता आहे. पोलीसच आरोपींना मदत करत आहेत. आरोपी लवकरच अटक होतील अशी अपेक्षा आहे. आरोपी विष्णू चाटे हा आकाच्या खालचा छोटा आका आहे. पोलिसांनी पकडलं असं वाटत नाही, ते स्वतः सरेंडर झाला आहे.मात्र आका लवकरात लवकर आत गेला पाहिजे. हा आता १००% खंडणीचा गुन्हा राहिलेला नाही. ३०२ चे मुख्य सूत्रधार वाल्मीक कराडच आहेत असा आरोप करीत त्या आकाला जेलमध्ये जावेच लागेल असे सुरेश धस यांनी महटले आहे. आज मंगळवारी २४ डिसेंबर रोजी सकाळी आष्टी मध्ये येतात माध्यमांची संवाद साधताना सुरेश धस यांनी संतोष देशमुख यांच्या खुनासह जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केला. यावेळी त्यांनी नव्याने आरोप करीत, संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी आत्ता सर्वत्र आंदोलन सुरू झाले असल्याचे म्हटले. आमदार सुरेश धस महणाले की, संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना १५ दिवसांचा पीसीआर मिळाला आहे.सीआयडी अधिका-यांना तपास करण्याची संधी मिळेल. काल रात्री सीएम साहेबांची सही झाली, आयजी दर्जाचे अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या हत्येचा तपास होणार आहे.तसेच याची न्यायालयीन चौकशी होईल असं जिल्ह्याचे आमदार सुरेश धस म्हणाले. राज्याच्या मुख्यमांनी मनावर घेतलय.या हत्येच्या घटनेमुळे जिल्ह्यासह महाराष्ट्रात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. तसेच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे मागील अडीच वर्षात भाड्याने दिले होते, यासह आमदार धनंजय मुंडेवर सुरेश धस यांनी गंभीर आरोप करत. संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य सूत्रधार व आरोपी अटक करावे व अजित पवार यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद घ्यावे असे मध्यमाशी बोलताना सांगितले.