ताज्या घडामोडी

हवेत गोळीबार करणाऱ्यावर परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल !

फायरिंग करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.

 

 परळी: हवेत गोळीबार करून व्हिडिओ काढणाऱ्या  कार्यकर्त्यावर अखेर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अखेर पोलिसांनी कारवाई करत संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी आज सकाळीच पत्रकार परिषद घेऊन हवेत गोळीबार करणाऱ्या कैलास फडवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती.सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील या फायरिंगबाबत माहिती घेऊन बीड पोलीस अधीक्षक यांना बीड जिल्ह्यातील शस्त्र परवाना बाबत माहिती मागवली. त्यात सर्वाधिक 1222 परभणी फक्त एकट्या बीड जिल्ह्यात असल्याची धक्कादायक महिती समोर आली आहे. बंदुकीचे परवाने देण्यासाठी कोणाची शिफारस होती याबाबत माहिती घेणार असून हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ शेअर करत बीडमधील गुंडागर्दी व दहशतीवरुन प्रश्न उपस्थित केले होते. या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. विशेष म्हणजे, बीडचे  पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत हेही अॅक्शन मोडमध्ये असून त्यांनी परळी शहर पोलिसांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यावर पोलीस हे.ह. विष्णू फड यांच्या फिर्यादीवरून कैलास फड यांच्या विरोधात कलम ५/२७,३० फार्म ऍक्ट अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला. शहरामध्ये कोणाकडे हवेचेस्त असतील तर पोलिसांना याची माहिती देण्याची आवाहन पोलिसांनी केले आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख स्वप्निल गलधर यांनी फेसबुक अकाउंट हून हवेत फायरिंग करतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ कधीचा आहे आणि फायरिंग का केली?हे तपासात अनेक बाबी समोर येण्याची शक्यता आहे. या व्हिडिओवरून बीडचा बिहार झाल्याची निश्चित दिसत आहे.

 

आनंद वीर

पत्रकार आणि पार्श्वभूमी दैनिकाचे जिल्हा प्रतिनिधी बातम्या व जाहिरातीसाठी थेट संपर्क करा - मो.: 8623880100 | ईमेल: veeranand478@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button