जोडप्यांना अवैधरित्या रूम दिल्याने हिलटॉप रिसॉर्टवर पोलिसांची धाड !
बीड शहरात काही लॉज बनले जोडप्यांचे, आंबटशौकीनाचे आवडते ठिकाण,पोलीस अधिक्षकाणी कारवाईचे आदेश द्यावेत.

बीड दि. २४ (प्रतिनिधी): बीड शहरापासून जवळच असलेल्या पाली शिवारात हॉटेल हिलटॉप रिसॉर्टमध्ये जोडप्यांना अवैधरित्या रूम भाड्याने दिल्या जातात व ओळख लपविण्यासाठी त्यांच्या नोंदी देखील घेतल्या जात नाहीत अशी माहिती API बाळराजे दराडे यांना मिळाल्यानंतर हिलटॉप रिसॉर्ट वर जाऊन झाडाझडती घेतली असता दोन रुम भाड्याने दिलेल्या असतांनाही त्याच्या कसल्याही नोंदी किंवा जोडप्यांचे आधारकार्ड घेतल्याचे आढळून आले नाही. सदरील रिसॉर्टचे मालक अक्षय किशोर वीर यांनी लॉजींग, बोर्डीगच्या नियमावलीचे उल्लंघन केल्या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान या रिसॉर्टमध्ये अनेक गैरप्रकार होत असल्याची चर्चा आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईतून तिथे नोंदी न सापडणे, आधारकार्ड न घेणे यातून त्यावर शिक्कामोर्तब होत असल्याचे दिसून येते.बीड पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या आदेशावरुन दि. २४ डिसेंबर रोजी स.पो.नि. बाळराजे दराडे, पो.ह. मस्के, सानप आणि आतिष मोराळे हे पाली बीट हद्दीत पेट्रोलिंग करत असतांना त्यांना हॉटेल हिलटॉप रिसॉर्ट येथे जोडप्यांना अवैधरित्या रुम भाड्याने दिल्या जातात, त्यांच्या नोंदीही घेतल्या जात नाहीत अशी माहिती मिळाली. त्यानुसार सायंकाळी ५ वाजता पोलिसांनी हॉटेल हिलटॉप रिसॉर्ट येथे छापा टाकून तेथील रिसेप्शनवरील मॅनेजरकडून नोंदवही तपासली असता त्यांची नोंद वहीत घेतल्याचे आढळून आले नाही. तसेच रुममधील जोडप्यांचे आधार कार्ड देखील घेतलेल आढळले नाहीत. काही रुममधील जोडपे व नोंद वहीत लिहिलेल्या नावात तफावत आढळून आली, शासनाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे लॉजींग, बोर्डीगच्या नियमावलीचे उल्लंघन केल्याचे तसेच रुम भाड्याने दिलेल्या नोंदी नोंदवहीत घेणे बंधनकारक असतांना त्या नोंदी न घेता रुम भाड्याने दिल्याचे यावेळी आढळून आले. त्यानुसार बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात पो.ह. आतिष मोराळे यांच्या फिर्यादीवरुन हॉटेल हिलटॉप रिसॉर्टचे मालक अक्षय वीर याच्याविरुद्ध लॉजींग व बोडींगच्या नियमावली, आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
बीड शहरातील लॉज, कॉफी शॉप मध्ये असे सर्रास प्रकार बिनधाास्त सुरू.
बीड शहरातील काही लॉज आणि कॉफी शॉपमध्ये देखील जोडप्यांना आणण्याचे प्रकार सर्रास होत आहेत. किशोरवयीन व आंबट शौकीनांसाठी असे लॉज आणि कॉफीशॉप म्हणजे हक्काचे अड्डे झाल्याचे दिसून येते. बीड शहरात किंवा आजपासून एकही मोठे पर्यटन स्थळ नसून केवळ जोडप्यांना व आंबटशोकीनाना भेटण्याचे ठिकाण म्हणजे लॉज आहे. काही महिन्यापूर्वी पोलिसांनी बीडमधील एका लॉज वर पोलिसांनी तपासणी केली असता त्या लॉज मध्ये अल्पवयीन मुलीला रूम दिल्याचे निष्पन्न झाले होते.त्यामुळें पोलिसांनी त्या लॉज व मॅनेजर वर कारवाई केली होती. परंतु तरीही असे प्रकार कमी होताना दिसत नाहीत. काही लॉज वाले अल्पवयीन मुलींना, वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना सर्रास रूम देतात.त्या लॉज,कॉफीशॉपवर कारवाई करून ते लॉज कायमस्वरूपी सील करण्यात यावी अशी मागणी होत आहे. आता नवे एस. पी. साहेब आले आहेत, त्यांनी अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे दाखविण्यासाठी नव्हे तर साहेबांचे आदेश म्हणून बीड शहरातील सर्वच लॉज, कॉफी शॉपची झाडाझडती घेऊन गैरकृत्य करणाऱ्यांना उचलून आतमध्ये टाकावे, केवळ एका रिसॉर्टवर कारवाई करून उपयोग नाही. त्यामुळे नूतन पोलीस अधीक्षकानी स्वतः लक्ष घालून शहरातील लॉजिंग तपासणीचे आदेश द्यावेत.