
केज(प्रतिनिधी) पोलिसांनी केज शहरातील क्रांतीनगर परिसरात सुरू असलेली गावठी दारूची हातभट्टी उध्वस्त केली. पोलिसांनी घटनास्थळावरून गुळमिश्रित फसफसते रसायन व गावठी दारूसह दहा हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी बारकाबाई शहाजी शिंदे त्यांच्याविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीत हातभट्टी दारू, मादक पदार्थ विक्री, अवैध हत्यारांची विक्री होणार नाही, याबाबत सर्च ऑपरेशन सुरू आहे. पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्या पथकाला केज शहरातील क्रांतीनगर परिसरात आरोपीने विनापरवाना बेकायदेशीर रित्या स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी गावठी हातभट्टीची दारू विक्री करत असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत मिळाली. त्यांच्या पथकाने पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार रोडे, महिला पोलीस हवालदार पाच पाकले व इतर पोलीस स्टाफ यांच्या उपस्थितीत दिनांक २४ डिसेंबर मंगळवार रोजी संध्याकाळी ६:१८ वाजता छापा टाकला असता त्या ठिकाणी गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणारे साधन, गुळ मिश्रित फसफसते रसायन, गावठी हातभट्टीची तयार दारू, लोखंडी टाकी असा १०२०० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.