देशमुख हत्येतील मास्टर माईंड व आरोपी अटक न झाल्यास उपोषण…खा.बजरंग सोनवणे.
१ जानेवारीपासून उपोषण करणार.

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची दिवसा ढवळे अपहरण करून हत्या करण्यात अली होती.हे प्रकरण मागील पंधरा दिवसापासून गाजत आहे या प्रकरणातील तीन आरोपी अद्यापही पोलिसांच्या ताब्यात आले नसल्याने जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात दिनांक २८ डिसेंबर बोजी सर्वपक्षीय व सर्व जातीय धर्मीय नागरिकांच्या वतीने मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे या मोर्चात खासदार शरद पवार आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील सहभागी होणार आहे. तसेच बीड जिल्हा सह महाराष्ट्रातील नागरिक, विविध सामाजिक संघटना सहभागी होणार आहेत.या पार्श्वभूमीवर केज येथे खासदार बजरंग सोनवणे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होते या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याची हमी दिल्यानंतरच देशमुख यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. मात्र १६ दिवस झाले तरीही पोलिसांना या प्रकरणातील प्रमुख आरोपी सापडत नसल्याने पोलिसांची भूमिका या प्रकरणात नेमकी काय आहे हे तपासण्याची गरज निर्माण झाली आहे.येत्या २८ डिसेंबरला संपूर्ण जिल्हा या मूक मोर्चा सहभागी होणार आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आपला लढा सुरूच असणार, एक जानेवारीला आपण उपोषण करणार असल्याचे खासदार सोनवणे यांनी म्हटले आहे जोपर्यंत सर्व आरोपी अटक होत नाही तोपर्यंत आपण उपोषण सोडणार नसल्याचे खासदार सोनवणे यांनी म्हटले आहे.